World Languages, asked by nkrish793, 6 months ago

महानगरपालिकेकडे
डास निर्मूलन करण्यासाठी
मच्छर विरोधी फवारणीची
मागणी करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by Sauron
58

उत्तर :-

\rule{300}{1.5}

पत्रलेखन (औपचारिक)

बी-701,

अजमेरा अरिया,

कोरेगाव पार्क ,

पुणे -411001

दिनांक - 08/11/2020

प्रति,

महापौर,

पुणे महानगरपालिका,

पुणे -411001.

विषय :- डास निर्मूलन करण्यासाठी मच्छर विरोधी औषध फवारणीची मागणी करणे बाबत.

माननीय महोदय / महोदया,

मी श्री ऋत्विज खुराणा, कोरेगाव पार्क येथे राहतो. वॉर्ड (प्रभाग) क्रमांक 27 इथे वास्तव्य करणारा रहिवासी म्हणून मी पत्र लिहीत आहे, या प्रभागांमध्ये गटारे आणि नाल्यां मध्ये पाणी साचून राहिलेले आहे त्याचा परिणाम मच्छरांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सफाई कर्मचारी तेथे फिरकले सुद्धा नाहीत त्याचाच परिणाम माशा आणि मच्छरांनी थैमान घातलेले आहे. डेंगू आणि मलेरिया यासारख्या रोग वाढीस ते कारणीभूत ठरत आहेत.

या विभागांमध्ये मच्छरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडत आहे त्यासाठी आवश्यक ते औषध फवारणी करून त्यावर प्रतिकार करता येईल आणि ते औषध फवारणी वेळेवर करावी आणि यासाठी विनंती.

तरी आपण जातीने लक्ष देऊन नागरिकांचे प्राण वाचवावे ही नम्र विनंती.

आपला,

ऋत्विज खुराणा.

\rule{300}{1.5}

Similar questions