India Languages, asked by guptavinayak479, 2 months ago

*महापालिकेच्या आरोग्य खात्यात लसीकरण
(vaccine) योजना राबवण्यासाठी विनंती पत्र
लिहा. (पत्रलेखन)​

Answers

Answered by mad210216
3

पत्रलेखन

Explanation:

२०१, अंकित हाइट्स,

जे.के.रोड,

क्रांतिनगर,

मुंबई.

दिनांक : ६ जून,२०२१

प्रति,

विभागीय अधिकारी,

आरोग्य विभाग,

मुंबई महानगरपालिका,

मुंबई.

विषय: लसीकरण योजना राबवण्याबाबत.

माननीय महोदय,

मी, महेश शर्मा, क्रांतिनगरचा रहिवाशी आहे. आमच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.

त्याचबरोबर, आमच्या विभागात वृद्ध लोकांची संख्या जास्त आहे. म्हणून, येथे कोरोना रोग झपाट्याने पसरण्याची भिती आहे.

त्यामुळे, लवकरात लवकर क्रांतिनगर रहिवाशांचे लसीकरण व्हायला हवे. म्हणून, मी विनंती करतो की आपण आमच्या विभागात लसीकरण मोहीमेचे त्वरित आयोजन करावे.

कळावे. तसदीबद्दल क्षमस्व.

आपला कृपाभिशाली,

महेश शर्मा.

Similar questions