महाराज सयाजीराव विद्यापीठ कुठे आहे
Answers
Answer:
गुजरातमधील बडोदा येथील एक विद्यापीठ. १८८१ मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड (१८६३−१९३९) यांनी बडोदा महाविद्यालयाची स्थापना केली. त्याचेच पुढे १९४९ साली विद्यापीठात रूपांतर झाले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठास त्यांचे नाव देण्यात आले. विद्यापीठाच्या अधिनियमान्वये विद्यापीठीय कक्षेतील महाविद्यालये व संस्था विद्यापीठाचे घटक बनली.
विद्यापीठाचे स्वरूप एकात्म व निवासी असून विद्यापीठ-परिसर ८०४ चौ.किमी. पर्यंत पसरला आहे. कला, विज्ञान, विधी, शिक्षण आणि मानसशास्त्र, वैद्यक, वाणिज्य तसेच तंत्रविद्या व अभियांत्रिकी या विद्याशाखांस शासकीय मान्यता लाभली असून ललित कला, गृहविज्ञान आणि समाजकार्य या तीन विद्याशाखा नंतर नव्याने उघडण्यात आल्या. विद्यापीठात बडोदा संस्कृत महाविद्यालय; भारतीय संगीत, नृत्य व नाट्यकला महाविद्यालय तसेच इतर सात संस्था आहेत. विद्यापीठाच्या शिक्षण व मानसशास्त्र या विद्याशाखेत विस्तार अध्ययनकेंद्राची सोय असून तेथे संशोधन कार्य, शोधनिबंधाचे प्रकाशन व चर्चासत्रे आयोजित केली जातात. विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रस्तुत विद्याशाखेस मान्यता दिली आहे.
विद्यापीठ भिन्न प्रकारच्या शिष्यवृत्त्या व विद्यावेतने देते. २९ जून ते २६ एप्रिल असे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष असून ते दोन सत्रांत विभागले आहे. विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमासाठी सामान्य शिक्षण कार्यक्रम आयोजित केला असून त्यास शासकीय मान्यता लाभलेली आहे.
पदवीपूर्व अध्ययनासाठी विद्यापीठाने पाठनिर्देशनाचा अवलंब केला असून त्यासाठी प्रत्येक विषयांतर्गत ३०% गुण राखून ठेवले जातात. प्रत्येक पाठनिर्देशनसमूहात साधारणपणे ३० विद्यार्थी असतात. विद्यापीठाच्या वतीने काही संस्थामध्ये प्रामुख्याने पदवीधर विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्रे आयोजित केली जातात. शिक्षण, मानसशास्त्र, गृहविज्ञान, सामाजिक विज्ञाने, अभियांत्रिकी व तंत्रविद्या ह्या विषयांच्या अभ्यासक्रमांत विद्यापीठाने सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. १९५१ मध्ये विद्यापीठाने अंतर्गत गुणांकन पद्धती सुरू केली असून बहुतांश अभ्यासक्रमांतर्गत या पद्धतीनुसार ३०% गुण पाठ्यक्रमावर दिले जातात. बहिःस्थ विद्यार्थी म्हणून कोणतीही परीक्षा देण्याची विद्यापीठात सोय नाही.
विद्यापीठाच्या वसतिगृहात मुलींच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था आहे. विद्यापीठाचे स्वतंत्र आरोग्यकेंद्र विद्यार्थ्यांस विविध आरोग्यसेवा पुरविते. विद्यापीठाने माहिती केंद्र स्थापन केले आहे. भारतीय व विदेशी विद्यापीठ तसेच अन्य शैक्षणिक संस्थांच्या विविध अभ्यास क्रमांस आवश्यक माहिती विद्यार्थी सल्लागार मंडळ गोळा करते व ती विद्यार्थ्यांस पुरविते. विद्यापीठाने स्वतंत्र क्रीडासंचालक आणि अधिकारीवर्गाची नियुक्ती केली असून त्यांच्याद्वारा अंतर्गेही व मैदानी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.
विद्यापीठाच्या आवारातच श्रीमती हंसा मेहता ग्रंथालय असून त्यात सु. २,९८,१५२ ग्रंथ व ४८,८५६ नियतकालिके होती (१९८१-८२). सुमारे १,००० विद्यार्थी ग्रंथवाचन करु शकतील, असे ग्रंथालयाचे वाचनदालन आहे. ग्रंथालयात सूक्ष्मपटाचीही सोय आहे. विद्यापीठात एकूण २४,३४१ विद्यार्थी व १,१९९ अध्यापक होते. (१९८१-८२). याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न आणि खर्च अनुक्रमे ४.५० कोटी रु. व ५.२१ कोटी रु. होता
Explanation:
hope it's help you
Answer:
महाराज सयाजीराव विद्यापीठ कुठे आहे