महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू
Answers
Answer:
ब्लू मॉरमॉन' हे राज्य फुलपाखरू म्हणून निवडण्यात आले खरे, पण अभ्याकांनी त्याची दुसरी बाजू उजेडात आणली आहे. ती म्हणजे हे फुलपाखरू लिंबू व संत्रावर्गीय वनस्पतींवर तण म्हणून जगते. त्यामुळे ते राज्य फुलपाखरू ठरल्यामुळे विदर्भातील संत्राउत्पादकांच्या चिंता वाढण्याची भीतीही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या 'ब्लू मॉरमॉन'ला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, या निर्णयावर फुलपाखरांच्या अभ्यासकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि परिपूर्ण माहिती न घेताच हा निर्णय घेतला असल्याची टीका त्यांनी केली आहे.
ईशान्य भारत हे फुलपाखरांचे नंदनवन. तेथील प्रसिद्ध भीमताल तलावाजवळील फुलपाखरू संशोधन केंद्रातील अभ्यासक पीटर स्मेटासेक यांनी ब्लू मॉरमॉनच्या विरोधात भूमिका घेतली आहे. विविध पर्यावरण अभ्यासक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते या गोष्टीचा प्रसार करत आहेत. त्यांची ही भूमिका व्हॉट्स अॅपच्या विविध ग्रुपमध्ये पसरवली जात आहे.
Explanation: