महाराष्ट्रामधील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती
लिहा..(300 शब्दात)
it is Marathi plss fast
Answers
महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती.
Answer:-
१. डॉ. मंदाकिनी आमटे - या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेविका असून त्या आनंदवन, चंद्रपूर येथील लोक बिरादरी प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मंदाताईंनी आपले पती प्रकाश आमटे यांच्यासोबत लोकसेवेचे नि:स्वार्थ कार्य केले आहे. या पती-पत्नींना मॅगेसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
२. मेधा पाटकर - 'नर्मदा बचाव' आंदोलनाच्या नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. टाटा सामाजिक शास्त्र संस्थेतून एम. ए. झालेल्या मेधा पाटकर यांनी विविध स्वयंसेवी संस्थांमधून काम केले आहे. सिंगूर नंदीग्रामाच्या सहा प्रश्नांवर (नॅनो प्रकल्प) त्यांनी आंदोलन केले होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी धरणग्रस्तांसाठी 'नर्मदा बचाव' आंदोलनात झोकून दिले आहे.
३. सिंधुताई सपकाळ - अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत, अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे समाजकार्य केले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत.
Explanation:
pls mark me as Brilliant
मला माहित नाही तू कित्विक आहेस