महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या दिवशी झाली
Answers
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तथा एम.आय.डी.सी. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक विकाससंस्था आहे. ही संस्था राज्यात औद्योगिक विकासाची वृद्धी व्हावी या करता महाराष्ट्र शासनाने स्थापन केली आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एम् आय डी सी) : महाराष्ट्रामध्ये उद्योगांची शीघ्र व सुव्यवस्थित प्रस्थापना तसेच वाढ व्हावी, या हेतूंनी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास विधी, १९६१ नुसार १ ऑगस्ट १९६२ रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ उभारले. (१) राज्याच्या सर्व भागांचे सारख्या प्रमाणात औद्योगिकीकरण व्हावे व (२) मुंबई-पुणे या औद्योगिक पट्ट्यामधील उद्योगसमूहांपासून उद्योगांचे विकिरण व्हावे, असे या महामंडळाच्या स्थापनेमागील दोन प्रमुख हेतू आहेत. यासाठी महामंडळ राज्यामध्ये शासनाने संपादन केलेल्या जागेवर सुनियोजित औद्योगिक क्षेत्रे स्थापणे व त्यांचा विकास करणे हे कार्य करते. खते, औषधे, ट्रक, स्कूटर, सायकली, घड्याळे, दूध शीतकरणाची इलेक्ट्रॉनिकीय उत्पादने, अन्नपदार्थ, शीतपेये, पशुखाद्ये, ओतशाळा इ. लहानमोठ्या उद्योगधंद्यांची या महामंडळाव्दारे उभारणी केली जाते.