महाराष्ट्र राज्यात फळबागा लागवडीस असणारे महत्त्व स्पष्ट करा
Answers
Answer:
देशामध्ये महाराष्ट्र राज्य कृषि क्षेत्रात अग्रगण्य आहे. राज्यातील जमीन, हवामान, पाऊसमान इत्यादींमध्ये वैविध्यता आहे. हवामानावर आधारित ९ कृषि हवामान विभाग राज्यात आहेत. राज्यातील वैविध्यपूर्ण हवामानामुळे वेगवेगळया प्रकारची फळे, भाजीपाला.फुलै, औषधी सुगंधी वनस्पती, मसाला पिके इत्यादिंची लागवड केली जाते.
देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकरी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे फलोत्पादनाच्या बाबतीत राज्याने देशपातळींवर इतर राज्याच्या तुलनेत क्रांतीकारक प्रगती केलेली आहे. राज्यामध्ये सन १९०९ मध्ये कृषि विभागाची स्थापना झाल्यापासून फलोत्पादन विभाग हा कृषेि विभागातील एक महत्वाचा भाग गणला जातो.
राज्याच्या सकल उत्पादनामध्ये फलोत्पादनाचा वाटा निश्चितच महत्वाचा राहिलेला आहे. सन १९८२ मध्ये फलोत्पादन विभाग कृषि विभागातून वेगळा करुन फलोत्पादन संचालनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्या कालावधीत फलोत्पादन विभागामार्फत फळे, भाजीपाला व फूलपिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळया योजना राबवल्या गेल्यामुळे फलोत्पादनाच्या प्रगतीस चांगली चालना मिळाली त्यानंतर सन १९९१-९२ मध्ये महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीची योजना सुरु केल्यामुळे फलोत्पादन क्षेत्र विस्तारास चांगली चालना मिळाली व देशात राज्य फर्लोत्पादन पिंकामध्ये अग्रगण्य ठरले.
सन १९९८ मध्ये कृषि विभागाची पुनर्रचना होऊन एकखेिडकी अंतर्गत सर्व विभाग एकत्रित करण्यात आले. त्यावेळेपासून फलोत्पादन हा कृषि विभागाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. फलोत्पादन विभागाच्या विविध योजना आता कृषि विभागामार्फत राबविल्या जात आहेत.
Explanation:
Hope it helps
Plz make me Brainlist Plz