Social Sciences, asked by suryvanshishamakaka, 6 months ago

महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत​

Answers

Answered by Itzkrushika156
0

Explanation:

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे, २०१७ सालापासून राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे. हे जिल्हे पुढे दर्शविलेल्या सहा प्रशासकीय विभागांमध्ये गटबद्ध आहेत.

. सिंधुदुर्ग जिल्हा : १ मे १९८१ रत्नागिरीमधून

२. जालना जिल्हा : १ मे १९८१ औरंगाबादमधून

३. लातूर जिल्हा : १६ ऑगस्ट १९८२ उस्मानाबादमधून

४. गडचिरोली जिल्हा : २६ ऑगस्ट १९८२ चंद्रपूरमधून

५. मुंबई उपनगर : १ ऑक्टोबर १९९० मुंबईमधून

६. गोंदिया जिल्हा : १ मे १९९९ भंडारामधून

७. हिंगोली जिल्हा : १ मे १९९९ परभणीमधून

८. नंदुरबार जिल्हा : १ जुलै १९९८ धुळेमधून

९. वाशिम जिल्हा : १ जुलै १९९८ अकोला मधून

१०. पालघर जिल्हा : १ ऑगस्ट २०१४ ठाणे मधून

महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हे :

कोकण विभाग (७ जिल्हे) :

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

पुणे विभाग (५ जिल्हे) :

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर.

नाशिक विभाग (५ जिल्हे) :

नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव.

औरंगाबाद विभाग (८ जिल्हे) :

औरंगाबाद, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, जालना, हिंगोली, बीड.

नागपूर विभाग (६ जिल्हे) :

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

अमरावती विभाग (५ जिल्हे) :

अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा.

FOLLOW ME

#महाराष्ट्रा

# मुंबई

#मराठी

Answered by khushi29171
0

36

महाराष्ट्र राज्यात ३६ जिल्हे आहेत

Similar questions