India Languages, asked by SwatiGawad, 1 year ago

महाराष्ट्र -संतांची भूमी निबंध

Answers

Answered by halamadrid
95

■■महाराष्ट्र - संतांची भूमी■■

महाराष्ट्राला संतांची भूमी समजले जाते. याचे कारण म्हणजे महाराष्ट्र भूमीत थोर व महान संतांनी जन्म घेतले आहे. त्यापैकी काही आहेत संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत नामदेव.

संतांचे योगदान खूप महत्वपूर्ण आहे. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभावना निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांनी लोकांना सदाचरण, प्रामाणिकपणा आणि वैश्विक बंधुतेचे संदेश दिले. संतांच्या गोष्टी ऐकून आपल्याला प्रेरणा मिळते.

संतांनी लोकांना देवावर विश्वास करण्यास शिकवले. त्यांनी लोकांना एकत्र आणण्याचे काम केले, त्यांना एकतेचे महत्व समझवले. संत भजन,कीर्तन करत असत. त्यांनी खूप अभंग आणि ग्रंथ लिहिली आहेत. संत त्यांच्या कीर्तनातून व अभंगांतून लोकांना उपदेश करत असत.

संतांचे अभंग अजूनही आपल्याला स्फूर्ती देतात. त्यांच्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देते, आपल्यावर चांगले संस्कार घडवतात. खरंच संतांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि माझा जन्म या पवित्र महाराष्ट्र भूमिवर झाला, यामुळे मी स्वतःला भाग्यवान समझते.

Answered by aryanshinde612
28

Explanation:

महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे.महाराष्ट्राच्या भूमीत भक्तीधारा आहे.याभूमीत अनेक संतांनी आपली भक्तीधारा वाढवत ईश्वरसेवा केली.असे कथन श्री स्वामी अशोकानंद महाराज यांनी केले.ते गजानन महाराज संस्थांन अकोली.जहाँ.- अकोलखेड येथे आयोजीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञात कथेचे पहीले पुष्प गुंफतांना बोलत होते. आपल्या कथा प्रवचनात पुढे बोलतांना ते म्हणाले.परमात्माशी केलेले प्रेम हे परमानंद देणारे आहे.शबरीने श्रीरामाच्या दर्शनासाठी प्रार्थना व प्रतिक्षा केली.कारण गुरुंचे वचन हे खोटे जाणार नाही हे त्यांना माहीती होते.जिथे भक्ती आहे.तिथे ज्ञान आहे व जिथे ज्ञान आहे तिथे वैराग्य आहे.ईश्वरसेवा हे सत्कर्म आहे तर दानधर्म हे शुभकार्य आहे असे ते म्हणाले. कथाप्रवचनाला सुरवात होण्याआधी भागवत ग्रंथ व कथावाचक श्री स्वामी अशोकानंद महाराज यांची टाळ मृदुंगाच्या गजरात कथास्थळीआगमन झाले.मुख्य यजमानांच्या हस्ते ग्रंथ पुजन करुन कथेला सुरुवात करण्यात आली.कथेचा पहील्या दिवसाचा समारोप आरतीने करण्यात आला.त्यानंतर संध्याकाळी हरीपाठ व हरीकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

Similar questions