(७) महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक----------- हे दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करीत असत. (अ) ना. स. इनामदार (ब) रणजित देसाई (क) विष्णुभट गोडसे (ड) गोपाळ नीळकंठ दांडेकर
Answers
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक--------- (ब) रणजित देसाई-
Answer:
(ड) गोपाळ नीळकंठ दांडेकर
Explanation:
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ नीळकंठ दांडेकर हे दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करीत असत.
‘महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचा चालताबोलता इतिहास’ असे गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचे वर्णन करण्यात येत असे. त्यांचा जन्म ८ जुलै १९१६ रोजी अमरावतीमधील परतवाडा येथे झाला. गोपाळ नीळकंठ दांडेकर यांनी अत्यंत सोप्या आणि मनोरंजक भाषेत चरित्रे, कथा, कादंबरी, लघुनिबंध अशा अनेक प्रकारची पुस्तके लिहिली आहेत. २६ कादंबऱ्या, ७ प्रवासवर्णने आणि ८ चरित्रपर पुस्तके असे अत्यंत विपुल लेखन त्यांनी केले. त्यांचे सर्वच लेखन लोकप्रिय झाले. शिवरायांवरच्या असीम भक्तीपोटी संपूर्ण शिवकाल आणि महत्त्वाचे टप्पे त्यांनी आपल्या लेखनातून लोकांसमोर आणले. त्यांना अनेक गडकिल्ल्यांची सखोल माहिती होती. गडकिल्ल्यांवर अनेक माहितीपूर्ण पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.