Hindi, asked by shindesachin5150, 18 days ago

महाराष्ट्रातील नाट्यसंगीताचा इतिहास स्पष्ट करा.​

Answers

Answered by shrutikshajadhav
0

Answer:

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, एकच प्याला ...अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ होता.

सवाई गंधर्व (२००८)

डिसेंबर १९१६ मध्ये संगीत स्वयंवर रंगभूमीवर आले. या नाटकात ३९ रागांचा वापर करून बांधलेली ५५ नाट्यगीते होती. या कालखंडात गाणी पुढे आणि नाटक मागे अशी परिस्थिती होती. ’संगीत कुलवधू’ या नाटकाद्वारे मास्टर कृष्णराव यांनी ही परिस्थिती बदलली. त्यांनी नाट्यपदांना भावगीतांच्या चाली दिल्या होत्या. इ.स. १९६० नंतर पं जितेंद्र अभिषेकी यांनी नाट्यपदांमध्ये सुगम संगीताला प्राधान्य दिले. त्यामुळे नाटकांत ताना मारून गाणारे नट सुगम संगीत गाऊ लागले.

समीक्षकांनी व अभ्यासकांनी संगीत नाटकांच्या इतिहासातील काळाचे टप्पे पुढीलप्रमाणे मानले आहेत.

किर्लोस्कर-देवल काळ - १८८० -१९१०खाडिलकर-बालगंधर्व काळ - १९१० - १९३०अत्रे-रांगणेकर काळ - १९३० - १९६०गोखले-कानेटकर काळ - १९६० - १९८०

गायनाचार्य भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव, पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, केशवराव भोळे असे दिग्गज संगीतरचनाकार (संगीतकार) लाभल्याने मराठी नाट्यसंगीत समृद्ध झाले. यातील प्रत्येक संगीतरचनाकार स्वतः उत्तम गायक होते. हिंदुस्थानभर भ्रमण करून संगीताचे ज्ञान आणि संस्कार त्यांनी आत्मसात केल्याने, त्याचे प्रतिबिंब नाट्यसंगीतात पडणे स्वाभाविक होते. उदाहरणार्थ ‘मानापमान’ नाटकातील अनेक चाली बनारस, लखनौ तसेच पंजाब येथील उपशास्त्रीय गायनप्रकारांवर बेतलेल्या आहेत. तसेच ‘स्वयंवर’ मधील अनेक पदे मूळ बंदिशींवर आधारली आहेत.

दरम्यान अभिजात शास्त्रीय संगीत गाणारे मोठे कलाकारही मैफिलीत नाट्यसंगीताचा समावेश करू लागले. उस्ताद अब्दुल करीम खॉं, सवाई गंधर्व, पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, ज्योत्स्ना भोळे, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, पं. राम मराठे, विनायकबुवा पटवर्धन, मास्टर कृष्णराव, निवृत्तीबुवा सरनाईक, मास्टर दीनानाथ मंगेशकर, मालिनी राजूरकर अशी अनेक शास्त्रीय गायकांची नावे सांगता येतील. नाट्यसंगीत सर्व स्तरांत लोकप्रिय करण्याचे काम या कलाकारांनी केले.

संगीत रंगभूमीवरील काही महत्त्वाचे कलाकारसंपादन करागायनाचार्य भास्करबुवा बखलेगोविंदराव टेंबेमास्टर दीनानाथ मंगेशकरबालगंधर्वकेशवराव भोसलेमास्टर कृष्णराव

Explanation:

plz mark as brilliant and like this answer

plz dear plz

Similar questions