History, asked by yashkadam2482005, 3 months ago

महाराष्ट्रातील प्रमुख ग्रंथालयांची माहिती लिहा​

Answers

Answered by arbindk946
13

Answer:

ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अति समृद्ध ग्रंथालय होते. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे-महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असत. ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ एस. आर. रंगनाथन यांच्या मते, ग्रंथालये ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय. चळवळ हा शब्द या ठिकाणी ग्रंथालयांचा विकास या अर्थाने आहे. बडोदा संस्थानांमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या चळवळीद्वारे सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला.

Answered by sayaligadhave2006
1

Answer:

सार्वजनिक वाचनालय, भंडारा (१८६३), लोकमान्य वाचनालय, आर्वी (१८६५), सार्वजनिक वाचनालय, वर्धा (१८७०), नवयुग वाचनालय, आकोट (१८७६), दस्तूर रतनजी ग्रंथालय, खामगाव (१८९९), सार्वजनिक वाचनालय, हिंगणघाट (१८९५), राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय, वाशिम (१८९९) आणि सार्वजनिक वाचनालय, अचलपूर (१८९९) ही ग्रंथालये उदयास आली.

Similar questions