महाराष्ट्रातील संतांची माहिती
Answers
Answered by
5
Answer:
संत ज्ञानेश्वर :
- संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स. १२७५ मध्ये औरंगाबाद मधील पैठणजवळील आपेगाव या गावी झाला होता.
- भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी (१८ अध्याय, ओवी ९ हजार) १२९० साली नेवासे सच्चिदानंद यांच्याकडून लिहून घेतली.
- संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथसंपदेत अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, अभंगाची गाथा इत्यादींची भर पडली.
- इ. स. १२९६ मध्ये संत ज्ञानेश्वर यांनी संजीवन समाधी आळंदी येथे घेतली.
संत नामदेव :
- इ.स. १२७० मध्ये संत नामदेवांचा जन्म पंढरपूर येथे झाला. त्यांचे मूळ गाव – नरसी बामणी (जि. हिंगोली) हे होते.
- त्यांचे संपूर्ण नाव नामदेव दामाशेट्टी शिंपी असे होते.
- संत नामदेवांच्या गुरुचे नाव संत विसोबा खेचर असे होते.
- आद्य कीर्तनकार या नावाने नामदेवांना ओळखल्या जात असे.
- ज्ञानेश्वर, सावतामाळी, चोखामेळा, गोराकुंभार, विसोबा खेचर यांच्या सोबत घेऊन नामदेवांनी भारतभर तीर्थयात्रा केली.
- ‘नामदेवजी की मुखबानी’ या त्यांच्या ओव्या ‘गुरु ग्रंथसाहेब’ शीख धर्माच्या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.
- ज्ञानेश्वरांचे समकालीन चरित्रकार म्हणून संत नामदेवांना संबोधले जात असे.
- इ. स. १३५० मध्ये संत नामदेव यांचा मृत्यू झाला.
संत एकनाथ :
- संत एकनाथ यांचा जन्म पैठण येथे इ. स. १५०४ मध्ये झाला. व ते पहिले समाजसुधारक संत होते.
- संत एकनाथाच्या गुरूंचे नाव जनार्दन स्वामी होते.
- संत एकनाथांनी अनेक भारुडे, गौळणी लिहिल्या.
- चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत (२० हजार ओव्या) , रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी त्यांच्या ग्रंथसंपदा आहेत.
- संत एकनाथांचा मृत्यू इ. स. १५९९ मध्ये पैठण येथे झाला.
संत चोखामेळा :
- जन्म:अज्ञात वर्ष – मृत्यू: इ.स. १३३८)
- त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.
Please make as a brainliest answer
Similar questions