महात्मा बसवेक्ष्वरांच्या काय्राचा समाजावर झालेल्या परीनाम लिहा
Answers
Explanation:
बाराव्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक महात्मा बसवेश्वर (बसवण्णा) यांचा जन्म इ.स.1131 च्या सुमारास कर्नाटकात विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे वै.शु. अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर झाला. सामाजिक आणि धार्मिक समतेच्या पुरस्कारासाठी लहानपणीच ते वीरशैव पंथाकडे आकृष्ट झाले. कुडलसंगम येथील वास्तव्यात बसवण्णांनी समाजातील वाईट चालीरीतींना शह देण्याचा सम्यक विचार केला. पुढे कामाच्या शोधार्थ बसवण्णा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे आले व येथे त्यांनी धार्मिक कर्मकांडाविरुद्ध आणि वर्णव्यवस्थेविरुद्ध सामाजिक चळवळ उभी केली. बसवेश्वरांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.
व्यक्तीच्या जन्मावरुन नव्हे तर, त्याच्या कार्यावरुन त्याची ओळख निर्माण होते, हे त्याकाळी लोकांना पटवून दिले. कायकवे कैलास या त्यांच्या सिद्धांतात कर्म करण्यातच स्वर्ग आहे, हा विचार त्यांनी मांडून परिश्रम हीच खरी पूजा असलेचे स्पष्ट केले. बसवेश्वरांनी जगातील पहिली लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ (1141) स्थापना केली. या संसदेमध्ये अठरापगड जातीच्या लोकांना मुक्त प्रवेश होता. या संसदेचे उद्दिष्ट समाजातील सर्व जातींना एकत्र आणून त्यांच्या अडचणी सोडविणे, हे होते. आजही स्त्रियांना समानतेसाठी संघर्ष करावा लागत आहे. तथापि, बाराव्या शतकात तर स्त्रियांची स्थिती फारच बिकट होती. बसवण्णांनी स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने स्थान देण्यासाठी तिला साक्षर करून त्यांनी सुरू केलेल्या अनुभवमंटपाच्या चर्चेत समानतेचे आणि मानाचे स्थान दिले.