महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वच्छ भारत निबंध मराठी
koni tari please Dya haa nibandh
(Some body please give me this answer i need urgently)
Answers
सरकारने स्वच्छतागृहांच्या निर्मितीचा व्यापक कार्यक्रम राबवला तर त्यातून लाखो-करोडो बायकांचे जीवन झाले तर थोडे सुकर होईल. परंतु भारतातील शासन व्यवहारांचे कळीचे दुखणे म्हणजे या व्यवहारांमध्ये सातत्य नाही. स्वच्छतेच्या प्रश्नाशी निगडित असणाऱ्या व्यवस्थात्मक-शोषणात्मक आयामांची प्रस्थापितांना जाणीव करून देण्यासाठी गांधींनी स्वत:च स्वच्छता करण्याचा मार्ग स्वीकारला आणि इतरांनाही स्वच्छतेचा-अंगमेहनतीचा सल्ला दिला.
पुलंच्या जमान्यातल्या अतिविशाल महिला मंडळांपासून तर सत्तरच्या दशकातल्या तारे-तारकांच्या समाजसेवेच्या तत्कालीन कल्पनांमधल्या गॉगल्स- पांढरे कपडे आणि फोटो या प्रकारच्या स्वच्छता मोहिमेपर्यंत आणि ‘स्वच्छ-सुंदर शाळा’ योजनेत बक्षीस मिळवणाऱ्या (परंतु मुलींसाठी स्वच्छतागृहांची सोय नसणाऱ्या) शाळांपासून तर निर्मल भारत अभियानापर्यंत आजवर सहसा नावापुरत्या- फोटोपुरत्या- प्रोत्साहनापुरत्या स्वच्छता मोहिमा अंगवळणी पडल्या होत्या. आता मात्र पंतप्रधानांच्या पुढाकाराने आणि भरघोस गुंतवणुकीतून सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छतेविषयीची चर्चा गांभीर्याने करावी लागेल असे दिसते.