महात्मा गांधी यांच्यावर आधारित निबंध
Mahatma Gandhi nibandh Marathi
Answers
Please mark as brain list......
महात्मा गांधी यांचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ मध्ये गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद उत्तमचंद गांधी तर आईचे नाव पुतळीबई करमचंद गांधी होते. सन १८८३ मध्ये मोहनदासांचा विवाह वयाच्या १३ व्या वर्षी कस्तुरबा यांच्याशी झाला. शालेय शिक्षण संपून वयाच्या १८ व्या वर्षी म्हणजे सन १८८८ मध्ये वकिलीचे शिक्षण घेण्याकरता ते इंग्लंडला गेले.१८९१ मध्ये वकिलीचे शिक्षण संपवून ते भारतात आले.त्यानंतर त्यांनी आपल्या वयाची २१ वर्षं दक्षिण आफ्रिकेत घालवली.१९१५ मध्ये गांधीजी कायमचे भारतात आले. त्यावेळचे भारतीय राजकारण आणि त्याच्या परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे त्यावेळच्या भारतीय कोंग्रेस पक्षाचे प्रमुख होते.१९२० मध्ये त्यांनी कोंग्रेसची सूत्रे हातात घेतली.त्यानंतर आंदोलने करत, मागण्या करत त्यांनी ब्रिटीश्यापासून भारताला स्वातंत्र मिळावे यासाठी खूप मेहनत घेतली. गांधीजींना पहिले मोठे यश चंपारण आणि खेडा मधील सत्याग्रहात मिळाले होते त्यानंतर दांडी यात्रा तसेच अनेक सत्याग्रह त्यांनी केले.त्यामुळे त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी बहाल करण्यात आली. ३० जानेवारी १९४८ रोजी सकाळी गांधीजी बागेत फिरत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली व त्यातच त्यांचा देहांत झाला. त्यावेळी त्यांच्या मुखातून हे राम हे शेवटचे शब्द होते.