Math, asked by ankitthere9, 3 months ago










महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने​

Answers

Answered by Itz2minback
4

Answer:

महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली येथे झाला. त्यांना सामाजिक कामाची आवड त्यांचे गुरुजी सोमण मास्तर यांनी लावली. त्यांचे इंग्रजी तीन इयत्तांचे शिक्षण मुरूडला झाले. त्यापुढील शिक्षणासाठी ते मुंबईच्या ‘रॉबर्ट मनी हायस्कूल’मध्ये दाखल झाले. पाचव्या, सहाव्या व सातव्या इयत्तेत त्यांना शिष्यवृत्ती मिळाल्या. शाळेत असल्यापासूनच ते शिकवण्या करीत. त्यांची गणित शिकवण्यात ख्याती होती. १८८४ साली बी. ए. च्या विद्यार्थ्यांत ते गणितात पहिले आले होते. सकाळी साडेचारला त्यांचा शिकवण्याचा कार्यक्रम सुरू होई. घरी आल्यानंतर रात्री ते पत्नी राधाबाईंना शिकवीत. राधाबाईंच्या मृत्यूनंतर पुनर्विवाह करायचाच तर विधवेशीच करायचा असे त्यांनी ठरविले. आपले स्नेही नरहरपंत यांची विधवा बहीण गोदूबाई हिच्याशी त्यांनी लग्न केले. (या गोदूबाई म्हणजे पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमधील विधवा-विद्यार्थिनी होत.)

१८९१ मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे सुमारे २३ वर्षे त्यांनी फर्ग्युसनमध्ये अध्यापनाचे कार्य केले. विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ स्थापन केली. या संस्थेच्या फंडाच्या व्याजाचा उपयोग पुनर्विवाहेच्छू विधवांच्या मदतीसाठी केला जात असे. १ जानेवारी, १८९९ रोजी त्यांनी पुण्यात ‘अनाथ बालिकाश्रम’ या संस्थेच्या कार्याची सुरुवात केली. (याच संस्थेला पुढे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था म्हणून ओळखले जाऊ लागले. आज ही संस्था महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणून सुपरिचित आहे.) १९०० साली महर्षी कर्वे यांनी आश्रमासाठी पुण्याजवळ हिंगणे येथे एक झोपडीवजा घर बांधले. येथेच त्यांनी स्त्री-शिक्षणाच्या कार्याची सुरुवात केली. १९०७ साली त्यांनी ‘महिला विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयात बालसंगोपन, आरोग्य, गृहजीवन शास्त्र आदी विषयांचे प्रशिक्षण महिलांना दिले जात होते. बदलत्या काळानुसार व गरजांनुसार कर्वे यांनी पुढे शिक्षणपद्धतीत व अभ्यासक्रमात अनेक सुधारणा केल्या. म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, पं. नेहरू अशा अनेक मान्यवर नेत्यांनी प्रत्यक्ष हिंगणे येथे भेट देऊन महर्षी कर्वे यांच्या कार्याची प्रशंसा केली होती.

Answered by manishabansode404
1

Answer:

please make me as brilliant.

Attachments:
Similar questions