English, asked by sonakshiNarayankar, 2 months ago

mahatma gandhi marathi nibandh short 10 lines​

Answers

Answered by ItzDinu
0

\huge \fbox \red{❥ Answer}

भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या

महात्माजींची जन्म दोन ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. 

१८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली. १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. सत्याग्रहाचा प्रयोगही त्यांनी तेथेच केला. तेथेच त्यांनी १९०३ मध्ये इंडियन ओपीनिय नावाचे वृत्तपत्र काढले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली. १९१४ मध्ये ते भारतात परतले. 

१९१५ पासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले. १९१७ मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे १९२०-२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन, १९३०-३२ दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग, १९४०-४२ दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन या सार्‍यात महात्माजींचे नेतृत्व झळाळून उठले. 

९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले. तेथे सहा मे १९४४ ला त्यांना सोडणअयात आले. त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीला आणले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर पंधरा ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. पण त्यावेळी हा महात्मा नोआखालीत सुरू असेलली जातीय दंगल विझवण्यासाठी काम करीत होता. लोकांसाठी आयुष्याचा होम करणार्‍या महात्मा गांधींना एका असंतुष्टाने तीस जानेवारी १९४८ मध्ये गोळी घातली. त्यातच त्यांचे निधन झाले. 

Answered by tarsam41gmailcom
2

Mahatma Gandhi Essay in English. Mahatma Gandhi, a champion of non-violence and messenger of truth, was born on 2nd October, 1869 in Porbandar, Gujarat. His full name was Mohandas Karamchand Gandhi and he belonged to an affluent family. He was a good student with a shy nature.

Similar questions