Art, asked by saichakri7737, 1 year ago

Mahavidyalayatil sneh summelan

Answers

Answered by Anonymous
0
This is your answers

स्नेह संमेलनाचे आकर्षण सगळ्यांनाच असते, लहान वयापासुन मोठ्यापर्यंत स्नेहसंमेलन भरत असतात.
आठवणीत राहतात रे शाळा कॊलेजचे स्नेहसंमेलन. तारीख घोषीत झाल्यापासुन किंबुहूना काही मुंलाना अगोदरच कुणकुण लागली असते त्यामुळे तयारी जोरात सुरु होते..

माझ्या भावाने पण तयारी केलेली आहे, उद्या त्याच्या मुलीचे स्नेहसंमेलन, त्याने सर्व प्रथम ऒफ़िसला सुट्टी टाकली, मुलीचा कॉस्चुम आणला, नातेवाईकाना सांगीतले, घरी सराव करुन घेतला. वेळेवर काय करेल तिचे तिलाच माहीत.

प्ले ग्रुप ते चौथी पर्यतचे स्नेहसंमलेन सुरु झाले की, सुरुवात प्ले ग्रुपच्या मुला/मुलींपासुन होते. प्रत्येकाने भाग घेतलेला असतो, प्रत्येक मुलगा खुशीत असतो. त्यांच्या चेहर्‍यावर अजिबात कार्यक्रमाचा ताण नसतो. थोडाफ़ार ताण आसतो तो त्यांच्या पालकावर, कसे करेल याचा. प्रत्येक पालक मुलांचा कार्यक्रम चालु असतांना आपल्याच मुलाकडे कौतुकाने बघत असतो. काही उत्साही पालक रंगमंचाजवळ जावुन आपल्या मोबाइल कॅमेरा, हॅन्डीकॆम द्वारे त्यांच्या मुलांचे छायाचित्रण करण्यासाठी धडपड करीत असतात. या गडबडीत कोणालाच कार्यक्रम व्यवस्थीत दिसत नाही.
अजुन कहर म्हणजे ते शाळेने ज्याच्याकडे छायाचित्रणाचे कंत्राट दिले असते त्याला भेटुन त्याला जास्तीचे पैसे देवुन त्याच्याच मुलाच्या कार्यक्रमाचे छायाचित्रण करुन घेतात.
नाटक, नकला, कवी संमेलन आजकाल स्नेहसंमेलनातुन हद्द पार झाल्यासारखे आहे, काही अपवाद वगळता, सगळीकडे गाण्यावर नाच हाच या संमेलनाचा अजेंडा बघायास मिळतो.

महाविद्यालयाच्या संमेलनात, एकमेकाशी भांडणे हे ठरलेले असते काही प्रंसंगी मारामारी खुर्च्या मोडतोड होवुन संमेलन रद्द करावी लागतात. तरी संमेलने हे होतच राहतात. आणी झालेच पाहिजे. कला जोपासली गेली पाहिजे त्यासाठी संमेलने आवश्यकच आहे परंतु अपेक्षा एवढीच आहे की गाण्यावर नाच या कार्यक्रमा व्यतीरीक्त अजुन काही कार्यक्रम होणे आवश्यक आहे.

स्नेहसंलेनाची एक आठवण आहे. आम्ही एक नाटक केले होते मोरुची मावशी. काही केल्या पाठ होइना, मग एका प्राम्टरला रंगमंचावर सोफ़्याखाली प्राम्टींग साठी लपवुन ठेवले, नाटक सुरु झाले अन संवाद विसरलो एक पेज संवाद पुन्हा रिपिट झाले, प्राम्टरचा आवाज येइना. शेवटी तिन अंकाचे चार अंक करावे लागले.
पडदा पडल्यावर प्राम्टरला बघितले तर चक्क स्वारी झोपली होती.

Similar questions