India Languages, asked by guravrutuja9001, 5 months ago

main Bharat bol tu aahe essay in Marathi​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

here is ur answer dude

Explanation:

मी "भारत" बोलतोय!

       नमस्कार माझ्या सर्व भारतीय बाळांनो,मी "भारत" बोलतोय.चकित झालात?म्हटलं आज तुमच्याशी गप्पा मारुयात.धकाधकीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या जीवनात तुम्ही सर्वजण खूपच Busy असतात.आज २६ जानेवारी त्यामुळे तुम्हाला सुट्टी असेल ना, ती पण official.तुमच्या Busy Schedule मधून तुमचा जरासाच वेळ घेतोय.मी कसा जन्माला आलो,माझा भूतकाळ काय किंवा इतिहास यांची उजळणी मी करणार नाही कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे.

       माझ्या कुशीत जन्माला आलेल्या माझ्या लेकरांनो कसे आहात सगळे?बघता बघता कित्ती मोठे झालात तुम्ही,वयाने आणि कर्तृत्वाने सुद्धा.मला खूप अभिमान वाटतो तुमचा तुम्ही सगळे माझी मान उंचावत आहात.माझी काही लेकरं परदेशी स्थायिक आहेत.ती तिकडे माझं नाव मोठं करत असतील याची आशा बाळगतो.हां आता आई बापा पासून लेकरू दूर परदेशी गेल्यावर त्याची आठवण हि येतेच ना असो.

आज तुमच्याशी बोलायचा हेतू असा कि काही दिवसांपासून मला एक प्रश्न सतावत आहे.मला एवढ तुमचं कौतुक आहे,माझ्या अंगाखांद्यावर खेळून लहानाचे मोठे झालेले तुम्ही सर्व ,तुम्हाला माझा अभिमान आहे का?

       "भारताचं"काही होणार नाही किंवा ''भारत'' म्हणजे गरीबी,खूप लोकसंख्या,प्रदूषण,अस्वछता,

भ्रष्टाचार,down market people,जातीयवाद,Reservation,  इ. गोष्टी आपल्याच लेकरांच्या तोंडून ऐकल्या ना  कि मनात चर्रर होतं हो.देवांच्या भूमीत होणाऱ्या बलात्काराला कोण जबाबदार?मी?प्रदूषण,भ्रष्टाचार,लोकसंख्या वाढ,गरीबी इ. गोष्टींना कोण जबाबदार?मी?अर्थातच तुम्ही जबाबदार आहात. लहान मुलं हि देवा घरची फुलं असतात पण घरात सोन्या सारखं कन्यारत्न जन्माला आलं की तिचा खून केला जातो हो हो खूनच. आणि खून नाहीच केला तर तिला जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागतात.हां तुमच्यातील काही जण असं अजिबात करीत नाहीत आणि तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. अभिमान आहे मला अशा लेकरांचा.साधं राष्ट्रगीताला तुम्ही नीट उभं राहू शकत नाहीत?तुम्हाला reservation वरून आपापसात भांडता येतं, परंतु तुम्हाला स्वतःच्या बळावर गोष्टी मिळवायच्या हे मी खूप लहानपणीच शिकवलं आहे,विसमरण झालं का त्या गोष्टींचं?तुम्हीच भ्रष्टाचाराला सुरवात केली आहेत.आज तुम्ही टोलेजंग इमारतीं मध्ये राहतायत.त्या साठी झाडे तोडलीत.तुम्ही प्रदूषण रोखण्यासाठी झाडं लावलाय सुरवात केलीत?पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणं तुम्हाला सहज जमतं परंतु त्यांच्या सारखे शिस्तबद्ध राहणं,नियम पाळणं तुम्हला वळत नाही.आणि वर "भारताचं"काही होणार नाही हे म्हणायचं.तुमच्याच भाषेत सांगायच तर ह्याला डबल ढोलकी म्हणतात.आज माझी जगाच्या  नकाशात मूर्ती जरी लहान दिसत असली तरी मी मंगळ मोहीम यशस्वी केली आहे.NASA मध्ये आज माझीच बाळे सर्वात जास्त आहेत.परदेशात Indian Brain सर्वात जास्त काम करत आहे.आजच्या माझ्या सर्व चांगल्या व वाईट  परिस्थितीला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात.

         माझ्यावर लागलेले बलात्कार, भ्रष्टाचार इ. डाग तुम्हीच पुसू शकतात.कसे ते तुम्हाला नक्कीच माहित आहे.तुमच्या सगळ्यांचा problem काय आहे माहितीये तुम्हाला ना "मी एकटा बदल घडवून काय होणार आहे" हेच तुमचं ब्रीदवाक्य आहे.वाईट वाटते मला जेव्हा तुम्ही असा विचार करतात.आज तिकडे सीमेवर माझी धाडसी लेकरे तुमचे आणि माझे रक्षण करीत आहेत आणि इकडे तुम्ही "भारताचं काही होणार नाही"हे म्हणून माझ्यावर शिंतोडे उडवत आहात.

फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत तुम्हाला नाही समजणार हो त्या साठी वीर सावरकर,लो.टिळक,गोडसे,आगरकर, स्वामी विवेकानंद,बोस,शिवाजी महाराज,पेशवे इ. अशा थोर पुरूषांचंच काळीज लागतं असो.

           माझं भविष्य हे तुम्ही आहात. माझ्यात बदल हा तुम्हीच घडवून आणू शकतात.खूप कष्टानं,अनेक क्रांतिवीरांच्या बलिदानाने मिळालेलं स्वातंत्र्य वाया घालवू नका हि कळकळीची विनंती करीत आहे.परदेशी असलेल्या माझ्या सर्व लेकरांनो परदेशी प्रगती करीत असताना मायदेशाचा विसर तुम्हाला कधी न व्हावा हीच माझी इच्छा आहे.तुमचे जन्म स्थान व तुमचे मूळ हे सैदैव तुमच्या ध्यानी राहू देत हीच विनंती .म्हटल्या प्रमाणे फार वेळ घेतला नाहीच मी तुमचा.तुमचे सगळ्यांचे कल्याण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

PLEASE MARK ME AS A BRAINLIST

Answered by SushmitaAhluwalia
0

मी भारत बोलत आहे

माझे हृदय उघडणे

भारतीय मी भारत बोलत आहे

हे माझे मनाचे दुखणे आहे, याला कथा म्हणून घेऊ नका

तुम्ही तुमची आधुनिकता सभ्यता म्हणून घेऊ नका

जेव्हा तुला असे वाटते की माझे डोळे ओले आहेत

तुम्ही असंवेदनशील असल्याबद्दल मला वाईट वाटते

तुमच्या पूर्वजांनी मला स्वातंत्र्य दिले हे खरे आहे

त्यांच्या त्यागाचे मोल तुम्हाला का कळले नाही?

त्यांना दिसणारे सुख-दु:ख तुम्ही विसरत आहात

आपल्या स्वतःच्या स्वार्थात पडून, आपण हा आयटम विसरलात.

माझी संसाधने मर्यादित आहेत मी तुम्हाला कसे समजावून सांगू शकतो

या वाढत्या लोकसंख्येचा भार मी कसा उचलणार?

प्रत्येक पावलावर तू फक्त माझाच उपयोग केला आहेस

वन खनिज संपत्ती नदीने माझे सर्व काही घेतले आहे

#SPJ3

Similar questions