India Languages, asked by shumanpaul9357, 11 months ago

maje mama essay in marathi

Answers

Answered by Hansika4871
20

*Majhe Mama*

*माझे मामा*

आईचा भाऊ महणजेच मामा, मामा आणि भाच्याचे नाते खूप अतूट, निर्मळ, प्रेमळ असते असं म्हणतात. असच काहीस माझ्या मामा सोबत देखील माझे नाते आहे. माझ्या आईच्या सख्या भावाचे, म्हणजेच माझ्या मामाचे नाव प्रदीप आहे. माझ्या मामाचे वय, आईपेक्षा जास्त आहे. माझा जरी तो मोठा मामा असला तरी माझ्यासाठी मित्रा पेक्षा कमी नाही.

मला अजूनही आठवतो तो दिवस (माझ्या आई, बाबांनी सांगितल्या नुसारे), जेव्हा मी जन्मलो तेव्हा बाबांपेक्षा खुश, माझा मामाच होता. गावभर पेढे वाटले होते त्यांनी. आई जेव्हा कामाला जायची तेव्हा माझी आजी आणि मामा माझी देखभाल करत. आजी मस्त जेवण बनवायची आणि संध्याकाळ झाली की मामा, मी आणि माझा मामेभाऊ आम्ही तिघे खेळायला जात. मामा आमच्या दोघांचे सगळे लाड पुरवत. खेळायला आम्ही नदीवर, गावाकडच्या शेतात, डोंगरांवर जात असू. माझे वडील बाहेरगावी असल्या कारणाने, ६ महिन्यातून एकदाच आमची भेट व्हायची, पण माझ्या मामाने माझ्या आयुष्यात वडिलांची पोकळी कधीही भासू दिली नाही.

खेळणं झाल्या नंतर, मामा आम्हाला खायला घेऊन जात असे. जे मागू ते आम्हाला द्यायचे, पाणी पुरी, शेव पुरी, पाव भाजी, आई स्क्रीम, चॉकलेट, केक इत्यादी. रात्री घरी परतल्यानंतर आई ऑफिस मधून आलेली असायची. तेव्हा मी आईला दिवसभर आम्ही काय मजा केली ते सांगायचो. अजूनही आठवतात ते क्षण. रात्री च्या जेवणाआधी माझी आई भावाचा अभ्यास घ्यायची आणि मामा माझा अभ्यास घेत असे.

कालांतराने आम्ही मुंबई स्तलांथर झालो. मामा अजूनही गावी असतो, आजोबांची शेती सांभाळतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी जात असे आम्ही खूप मजा अजूनही आम्ही करतो.

असा माझा मामा मला खूप आवडतो.

Answered by ishanpawar7755
3

Answer:

thank you ❤❤❤Oiii chumi u

Similar questions