Majha Ranatla anubhav... nibandh in marathi
Answers
Answer:
कोरोना विरोधातील लढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासोबतच देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंबाबत गैरसोय होऊ नये याकडेही महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी विशेष लक्ष दिले आहे. या अनुषंगाने सुजाण नवी मुंबईकर नागरिक लॉकडाऊनच्या काळात घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपले अमू ल्य योगदान देत आहेत.
या काळात घरातच असणा-या नागरिकांचे मनोबल उंचाविण्यासाठी मानसोपचार समुपदेशन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांनी 022-35155012 या क्रमांकावर संपर्क साधल्यास महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणा-या 8 नामवंत क्लिनिकल सायकॉलोजीस्टपैकी एकजण त्या नागरिकाशी संवाद साधत असून कोरोना विषयक परिस्थितीमुळे आलेला ताण-तणाव दूर करीत आहेत.
अशाप्रकारे नागरिकांच्या मानसिकतेचा सखोल विचार करतानाच त्यांच्या अंगभूत कल्पकतेला आणि प्रतिभेला संधी मिळावी व घरात असलेल्या नागरिकांच्या सकारात्मक विचार क्षमतेला चालना मिळावी यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने "कोरोनाशी लढा - निरोगी रहा" या विषयावर "कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक निबंध आणि कविता स्पर्धा" आयोजित करण्यात येत आहे.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना विषयीच्या लढ्यातील आपले अनुभव, सूचना, संकल्पना सादर करण्याची संधी मिळणार असून निबंध स्पर्धेतील सहभागाकरीता 700 शब्दांचा निबंध तसेच कविता स्पर्धेतील सहभागाकरिता 16 ओळींची कविता ही मराठी / हिंदी / इंग्रजी यापैकी एका भाषेत [email protected] या ईमेल आयडीवर आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी नमूद करून पीडीएफ स्वरूपात 1 मे 2020 पर्यंत पाठवावयाची आहे.
लॉकडाऊनच्या काळात घरातच असलेल्या नागरिकांना विचारप्रणव बनविण्यासाठी ही निबंध व कविता स्पर्धा अत्यंत महत्वाची ठरणार असून या निमित्ताने नागरिक कोरोना विषयीच्या नकारात्मक विचारांपासून दूर जातीव व कोरोना विरोधातील लढ्याबाबत सकारात्मक विचार करतील असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयु्क्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
#Be Brainly :) !!