India Languages, asked by mansinkale48, 11 months ago

Majhe Swapna essay in marathi​

Answers

Answered by kalyani97
0

Answer:

माझे स्वप्न

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात काही न काही स्वप्न रचून ठेवतो. त्याला आयुष्यामध्ये काय काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे आणि काय बनायचे आहे इत्यादी गोष्टीचा प्रत्येक विद्यार्थी विचार करीत असतो. काहींचे स्वप्न इंजिनियर बनायचे असते, काही लेखक तर काही पोलिस व शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न पाहत असतात. मी सुद्धा मला मोठे होऊन काय बनायचे आहे याचा विचार करून ठेवला आहे. माझ्या आयुष्याचे ध्येय डॉक्टर बनायचे आहे व अनेकांचे प्राण वाचवून नवीन जीवन द्यायचे आहे. 

जरी डॉक्टर देव नसतो तरी त्याच्या हातात जीवन मृत्यूचा निर्णय असतो. जरी डॉक्टर मृत व्यक्तीला जिवंत करू शकत नाही तरी तो कठीण परिस्थितीतून रुग्णांना काढू शकतो. मी लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत आहे. मी पाहिले आहे की काही डॉक्टर फक्त पैशांसाठी आपले काम करतात. परंतु माझ्या जीवनाचे ध्येय डॉक्टर बनून पैसे कमावणे नाही आहे. मला लोकांची मनोभावे सहायता करायची आहे. जे गरीब आहेत व मोठं मोठ्या रोगांनी ग्रस्त आहेत त्याची सेवा मी करणार आहे. 

आज आपल्या देशासह जगभरात नवनवीन रोग पसरत आहेत. जर मी डॉक्टर बनून या रोगांच्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले तर मला खूप आवडेल. आज आपल्या समाजात खूप सारे असे लोक आहेत ज्यांना कमी वयात अनेक रोगांनी ग्रासले आहे. मी डॉक्टर बनून लोकांना जास्त प्रमाणात दवा औषधी खाण्यापेक्षा व्यायामाचे महत्त्व समजावून सांगेल. आयुर्वेदिक पद्धतीने रोगांना नियंत्रणात करण्यासाठी मी प्रयत्न करेल.

मी लहान असताना माझे वडील मला सांगायचे की बेटा तुला मोठे होऊन काहीतरी असे करायचे आहे की तू अधिकाधिक लोकांची मदत करू शकशील. डॉक्टर बनण्याचे स्वप्न मी तेव्हापासून पाहू लागलो. कारण डॉक्टर बनुनच मी रोगांनी ग्रस्त लोकांची सेवा करू शकेल. मी डॉक्टर बनल्यावर कमी पैश्यात अधिकाधिक लोकांची सेवा करेल व समाजाला निरोगी बनवण्यासाठी कार्य करेल.

माझे ध्येय इंजीनियर निबंध

मुलांना लहान पानापासून आयुष्यात काहीतरी मोठे बनण्यासाठी प्रेरित केले जाते. व शाळा कॉलेज मध्ये जाणाऱ्या प्रत्येक मुला मुलींचे करीयर विषयी काहीतरी स्वप्न असतेच. मी सुद्धा दुसरी तिसरीत असताना शास्त्रज्ञ बनायचे स्वप्न पहायचो. या नंतर जेव्हा मी टीव्ही पाहू लागलो व मला बाहेरील जगाबद्दल कळू लागले तेव्हा मी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहू लागलो. परंतु जेव्हा मी 8 वी मध्ये गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की माझी खरी आवड तंत्रज्ञानात आहे आणि मी निर्णय घेतला की मला इंजिनिअर बनायचे आहे. आता माझे स्वप्न इंजिनिअर बनणे आहे. 

तसे पाहता इंजिनीरिंग हे एक विस्तृत करीयर क्षेत्र आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल,सिव्हिल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल, बायो केमिकल इत्यादी प्रकार समाविष्ट आहेत. परंतु मला कॉम्प्युटर सायन्स मध्ये अधिक आवड आहे. माझ्या वडिलांनी माझी ही आवड ओळखून मला एक लॅपटॉप आणून दिले आहे. या मध्ये मी बेसिक कोडींग शिकत आहे. जेणेकरून कॉलेज मध्ये गेल्यावर मला कॉम्प्युटर सायन्स जास्त कठीण वाटणार नाही. 

मी इंजिनिअर बनण्याचे स्वप्न यासाठीही पाहिले आहे कारण मला मोठे होऊन देशाच्या तांत्रिक विकासामध्ये मोठे योगदान द्यायचे आहे आणि यासाठी इंजिनिअरिंग शिवाय दुसरे कोणतेच शिक्षण योग्य नाही. मला कॉम्प्युटर बद्दल आधी पासूनच कुतूहल आहे. व आता तर मी खूपच मन लाऊन त्याचा अभ्यास करीत असतो. मागील दोन वर्षात शालेय परीक्षेत मला संगणक विषयात संपूर्ण वर्गात सर्वात जास्त गुण मिळाले आहे. पुढील शिक्षणासाठी माझे वडील मला उच्च महाविद्यालयात प्रवेश करवून देणार आहेत. त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ते म्हणतात की एक दिवस तू तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण करशील.

plz mark me as brainliest...........

Answered by vaishnavigadhave690
0

Answer:

माझ्या आयुष्यात खूप स्वप्ने आहेत. मला डॉक्टर व्हायचे आहे. मला लहानपणापासून लोकांना मदत करायची होती. मला लोकांना हसवायचे होते. प्रत्येकाने लोभापासून मुक्त व्हावे असे मला वाटते. आपण एकमेकांवर प्रेम केले पाहिजे. समाजात प्रत्येकजण समान असतो. आपल्या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे त्यांना चांगले उपचार घेण्याची पुरेशी संधी नाही. ते आजारी पडल्यावर त्यांना डॉक्टर मिळत नाही. आणि म्हणूनच डॉक्टर झाल्यानंतर मला या लोकांना मदत करायची आहे.

माझे पालक खूप सपोर्टिव्ह आहेत. ते मला नेहमी लोकांना मदत करण्यासारखे चांगले काम करण्यास प्रेरित करतात. मी डॉक्टर होऊन लोकांना मदत करावी अशी त्यांची इच्छा आहे. माझे ध्येय गाठण्यासाठी मी खूप अभ्यास करत आहे. मला आशा आहे की मी एक दिवस डॉक्टर होण्यात यशस्वी होईल. डॉक्टर होणे इतके सोपे नाही. वैद्यकीय शाळेत प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो. मला आशा आहे की मी ते बनवेल.

Explanation:

thaks mark me as brainlist

Similar questions