India Languages, asked by Shounak26, 1 year ago

"Majhya swapnatil bharat" essay in marathi 100 words

Answers

Answered by Anonymous
46

Explanation:

माझ्या स्वप्नातील भारत

धन्य धान्य पुष्प भरी, वसुंधरा ही अपुली ...|

ज्यामध्ये हा देश अपुला, साऱ्या देशांतून न्यारा ...||

गेल्या शतकापासून भारत देशाने बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, बहुसामाजिक ह्या साऱ्याच वर्तुळांमध्ये स्थिर प्रगती साधली आहे. भारत देश त्याच्या प्राचीन इतिहासासाठी आणि विविधतेत असलेल्या एकतेसाठी ओळखला जातो. ह्या दशकात भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण तसेच विविध क्षेत्रांतील विकास पाहिला.

डॉ. अब्दुल कलामांनी एका लहान मुलीला विचारले, “तुझ्या स्वप्नातील भारत कसा आहे? ” तिने उत्तर दिले की, “मी विकसित भारताचे स्वान पाहते.” तिच्या उत्तराने ते प्रचंड प्रभावित झाले आणि प्रामाणिकपणे माझे ही हेच स्वप्न आहे. मी एका संपूर्ण विकसित भारताचे स्वप्न पाहतो. जो साऱ्या क्षेत्रांत उत्तुंग यशशिखरावर तर असेलच पण, त्यासोबतच जिथे भारताच्या अखंड संस्कृतीचा वारसा जपला गेला असेल.

असा भारत, जिथे प्रत्येक नागरिक साक्षरतेच्या छत्रछायेखाली विसावेल. कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही. जिथे ज्ञान फक्त रोजगार किंवा नोकरी मिळवण्यापुर्त मर्यादित नसेल. जे नागरिक लहानपणी शिक्षण घेऊ शकले नाहीत, त्यांना प्रौढ शिक्षणाद्वारे साक्षर बनवण्याची जबाबदारी घेतली जाईल. ज्या भारताचे सरकार “स्कील इंडिया, मुद्रा योजना, इ.” सारख्या रोजगाराच्या समान संधी प्रदान करेल. प्रत्येक नागरिक सुखी-समाधानी राहील आणि हीच भारताची खरी प्रगती ठरेल.

माझ्या स्वप्नातील भारत देशात, विविध वैज्ञानिक महत्त्वपूर्ण संशोधनात मग्न असतील. असा भारत, जो महान वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी ओळखला जाईल. टाटा आणि बिरलाच्या आवडी असे नवीन शोध गाठतील ज्याने संपूर्ण विश्व चकित होईल. महान देश विचार करतील की, “भारताने असाध्य ते साध्य करून दाखवले. जो देश फक्त नवनवीन शोधांचेच नेतृत्व करत नसेल तर, तो अध्यात्मामधेही तितकाच अग्रेसर असेल.

त्या भारत देशात निरंतर प्रगती आणि विकास सोबत साधले जातील. प्रत्येक नागरिक त्याच्या संपूर्ण आयुमानात १०-२० झाडे लावून त्यांचे मुलांप्रमाणे संगोपन करेल. वन्यजीवन शिकारीपासून सुरक्षित असेल, मनुष्य आणि निसर्गाचे अतूट नाते असेल. जिथे सत्यावाचून परमार्थ नसेल आणि भ्रष्टाचार नसेल, अशा भारत देशाचे मी स्वप्न पाहतो.

असा भारत, जिथे स्त्रियांचा आदर ही पहिली शिकवण असेल आणि बहुधार्मिक लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतील. प्रत्येक भारतीयाला, भारतीय असल्याचा अभिमान असेल. ज्यामुळे संपूर्ण गुन्हेगारी क्षेत्र संपुष्टात आलेले असेल. मी एका अशा भारताचे स्वप्न पाहतोय, जिथे प्रत्येक परिसर, रस्ते नीटनेटके असतील. सुस्वच्छ्तेचे उच्च प्रमाण राखून ठेवले जाईल आणि रोगराईचे सारे प्रश्न दूर सारले जातील.

माझ्या स्वप्नातील भारतात, शेतकऱ्याला कुठल्याही उच्च व्यवसायाइतका मान दिला जाईल. अंधश्रद्धेची पालंमुळं उखडून टाकलेली असतील आणि असा भारत जो विकासासोबतच खेळातही नैपुण्यशील असेल. ओलम्पिक्स आणि इतर आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारत अग्रेसर असेल. हा आहे माझ्या स्वप्नातील भारत, जिथे मला एक भारतीय म्हणून जगायचंय.

हा माझ्या स्वप्नातील विकसित भारत देश आहे. जो आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी, सुख-शांती-समाधानासाठी ओळखला जाईल आणि शेवटी रवींद्रनाथ टागोर यांच्या काही ओळींनी स्वप्नातील भारताला अधोरेखित करू पाहतो,

“जिथे शिर अभिमानाने उंच असेल,

जिथे चित्त भयापासून शून्य असेल.

हे ईश्वरा...! अश्या स्वातंत्र्याच्या स्वर्गात,

माझ्या निजलेल्या भारताला जागे कर...

माझ्या निजलेल्या भारताला जागे कर...”

.

Answered by HanitaHImesh
1

माझ्या स्वप्नांचा भारत

भारत असा देश आहे जिथे सर्व संस्कृती आणि धर्माचे लोक एकत्र राहतात. मला असे वाटते की आपल्यापैकी प्रत्येकाने भारताच्या कोणत्या ना कोणत्या आवृत्तीचे स्वप्न पाहिले आहे. साहजिकच, आपण कधीही कशाचीही स्वप्ने पाहू शकतो आणि भारतीय नागरिक म्हणून आपण आपला देश सुधारण्यासाठी आणि एक चांगला भारत पाहण्यासाठी सतत पद्धती शोधत असतो.

आपल्या महान देशासाठी शांतता आणि समृद्धी ही माझी आशा आहे. भारत एक महान देश असेल जेव्हा प्रत्येक नागरिक कायद्याचे नियम पाळेल, त्यांच्या कुटुंबासह राष्ट्राला पाठिंबा देईल आणि भारताला एक चांगले स्थान बनवण्यासाठी काहीतरी करेल.

माझ्या स्वप्नातील भारत असा देश असेल जिथे महिला सुरक्षित असतील आणि रस्त्यावर मुक्तपणे फिरतील. तसेच, हे असे ठिकाण असेल जिथे सर्वांना समानतेचे स्वातंत्र्य असेल आणि प्रत्येकजण खर्‍या अर्थाने त्याचा आनंद घेऊ शकेल. शिवाय, हे असे ठिकाण असेल जिथे जात, रंग, लिंग, पंथ, सामाजिक किंवा आर्थिक स्थिती आणि वंश असा कोणताही भेदभाव नाही.

जर आपण सर्व गोष्टींचा एकत्रितपणे विचार केला तर आपण जगातील सर्व समस्यांची कारणे आणि उपाय ओळखू शकू. त्याचप्रमाणे, एक महान राष्ट्र निर्माण करणे आणि त्याच्या खोलवर रुजलेल्या समस्यांचे निराकरण करणे हे एक साध्य करण्यायोग्य ध्येय आहे.

जेव्हा या गोष्टी प्रत्यक्षात येतील, तेव्हा संपूर्ण देश दखल घेईल आणि प्रत्येकाला निरोगी आणि समृद्ध जीवनाचा आनंद घेण्याची संधी मिळेल. म्हणूनच आपल्या देशात बदल घडवून आणण्यासाठी आणि लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबासह आणि समाजासोबत काम केले पाहिजे, तसेच आपल्या सरकारला पाठिंबा दिला पाहिजे, जे समाजातील सर्व घटकांना पुरेसे शिक्षण, वाहतूक, प्रत्येकासाठी अन्न आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे.

#SPJ3

Similar questions