majhya swapnatil shala essay
Answers
Answer:
शाळा म्हणजे बालकाचे चारित्र्य घडवणाऱ्या संस्था होय. यशस्वी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी आवश्यक जीवन मूल्य शिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न शाळेच्या माध्यमातून केला जातो.
सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा वाढल्याचे चित्र मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. पाठ्यपुस्तकांची गुणवत्तादेखील वाढलेली आपल्याला बघायला मिळते. परंतु शिक्षण गुणवत्तापूर्ण होईलच याची शाश्वती पूर्णपणे देता येत नाही.
माझ्या स्वप्नातील शाळा मात्र या सर्व गोष्टींच्या विरुद्ध असेल. भौतिकतेच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वंकष आणि सर्वांगीण विकासाला चालना देणारी माझ्या स्वप्नातील शाळा असेल. ज्या ठिकाणी फक्त ध्येयाने पछाडलेले विद्यार्थी जगाच्या विकासासाठी सतत प्रयत्न करतील. हे ध्येय विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवण्याची त्यांना मुभा असेल. माझ्या स्वप्नातील शाळा विद्यार्थ्यांना स्वतःचे ध्येय कसे ठरवावे आणि स्वतः आतील गुणवत्ता व क्षमता कशा ओळखाव्यात आणि त्या कशा विकसित कराव्यात याचे मार्गदर्शन मात्र मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.
जडत्वाचा शोध घेणाऱ्या विज्ञानाच्या संशोधनाबरोबरच भाव-भावना असणाऱ्या हाडा मासांच्या माणसांच्या मानसिक आणि शारीरिक उत्थानासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या युवकांची निर्मिती माझ्या स्वप्नातील शाळेमध्ये होईल. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला पूर्ण वाव असेल. विद्यार्थ्यांना सूचनाऱ्या नवनवीन कल्पना प्रत्यक्ष कृतीद्वारे बघण्याची सुविधा माझ्या स्वप्नातील शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.
विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संस्कार रुजवण्यासाठी नियमितपणे संस्कारांचे धडे दिले जातील. कृतिशील उपक्रमांची नियोजनबद्ध गुंफण करून विद्यार्थी अध्ययन अनुभव जास्तीत जास्त प्रमाणात कसे संपादन करु शकतील यावर भर दिला जाईल.विद्यार्थ्यांना सतत नवनवीन अध्ययन अनुभव कसे मिळतील अशा वातावरणाची निर्मिती माझ्या स्वप्नातील शाळेमध्ये सतत केली जाईल.
माझ्या स्वप्नातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जास्तीत जास्त वाव देण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी आणि नियोजन करण्यात येईल.प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभिवृत्ती आणि कल चाचण्या घेण्यात येतील . त्यातून निष्पन्न होणाऱ्या निकालाद्वारे विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी जाणून घेऊन त्यांना त्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यावर माझ्या स्वप्नातील शाळेमध्ये सर्वाधिक भर दिलेला असेल.
शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी माझी शाळा कल्पवृक्ष ठरली पाहिजे. विद्यार्थी शाळेत येण्यासाठी अगदी उतावीळ झाला पाहिजे. शाळेत आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला आईच्या कुशीत आलो आहोत इतके प्रेम प्रत्येक शिक्षकाकडून व गुरु जणांकडून मिळेल.
प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडी-निवडी जपण्याचे स्वातंत्र्य असेल. आपल्या कल्पना मांडण्यासाठी प्रत्येकाला व्यासपीठ उपलब्ध होईल अशी व्यवस्था या शाळेमध्ये असेल. चित्रकला ,नृत्य कला, संगीत विविध क्रीडा प्रकार या सर्वांमध्ये नावलौकिक मिळवणारे जागतिक कीर्तीचे खेळाडू माझ्या स्वप्नातील शाळेमध्ये आकारास येतील.
माझ्या स्वप्नातील शाळेला एक सुंदर बाग असेल. या बागेमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड विद्यार्थ्यांनी द्वारे करून घेतले जाईल. प्रत्येक वनस्पतीचे महत्त्व त्यांचे वैज्ञानिक नाव विद्यार्थ्यांना माहित असेल. प्रत्येक विद्यार्थ्यांना कमीत कमी एक झाड दहा वर्षांपर्यंत जगवणे सक्तीचे असेल.
Answer:
प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शाळेचा समावेश होतो, त्यामुळे भविष्यात एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांनी उत्कृष्ट शाळा असायला हव्यात. माझ्या मते एक चांगली शाळा पात्र शिक्षकांसह सुरू होईल.
Explanation:
माझ्या मते एक चांगली शाळा पात्र शिक्षकांसह सुरू होईल. शिक्षक विद्यार्थ्यांचे होकायंत्र बिंदू म्हणून काम करतात आणि उत्साही शिक्षक निःसंशयपणे विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या सामग्रीमध्ये रस निर्माण करण्यास मदत करतील. ते विद्यार्थ्यांची क्षमता ओळखतील आणि त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करतील.
एक उत्कृष्ट शिक्षक देखील विद्यार्थ्यांशी उत्कृष्ट मित्र बनवेल. त्यानंतर चार भिंती असलेल्या मानक वर्गखोल्यांचे डिझाइन बदलले जाईल. विद्यार्थ्यांनी शोधात गुंतले पाहिजे आणि त्यांची ज्ञानाची तहान भागवली पाहिजे.
शाळेतील त्यांचा वेळ वर्गाच्या चार भिंतींपुरता मर्यादित न ठेवता, आउटडोअर आणि इनडोअर क्लासरूम विभागांचे एक विलक्षण मिश्रण विद्यार्थ्यांना अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यास आणि अधिक सक्रिय वाटण्यास मदत करेल.
माझ्या स्वप्नांच्या शाळेतील अभ्यासक्रमाची रचना अशी असावी की तो सहभागात्मक असेल आणि त्यात सिद्धांत आणि व्यावहारिक वर्गांचा आदर्श समतोल असेल. समजून घेण्यासाठी व्हिज्युअलायझिंग सहाय्यक, म्हणून पाठ्यपुस्तकांमधून टॅब आणि उच्च-तंत्रज्ञान साधनांवर स्विच करणे देखील सुधारित शिक्षण आणि आकलनासाठी प्रक्रियेचा भाग असणे आवश्यक आहे. अवजड बॅग किंवा सॅक प्रणाली वापरणे टाळण्यासाठी आणि सर्व व्याख्यान साहित्य साठवण्यासाठी परवानगी देण्यासाठी, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅबचा एक संच दिला पाहिजे.
Learn more about it:
https://brainly.in/question/938262
https://brainly.in/question/35265535
#SPJ2