मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात
Answers
Answer:
१) मक्याचे दाणे उकडून त्यात मीठ, चाट मसाला व लिंबू पिळून घ्यायचे. आवडत असल्यास बारीक चिरून कांदा/ काकडी ही चविष्ट करून खावे.
२) तूप/ बटर मध्ये कच्चे मक्याचे दाणे मीठ मिरपूड टाकून परतून घेते. आवडत असल्यास “चिली फ्लेक्स” वरतून टाकून घ्यायचे.
३) मीठ टाकून मक्याचे दाणे उकडून त्यात जिरे पूड व चिंचगूळाची चटणी टाकावी… मस्त चव येईल.
४) मका पुलाव - नेहमी सारखा पुलाव त्यात लाल व हिरवी ढोबळी मिर्ची व मक्याचे दाणे. सुंदर दिसतो पुलाव.
५) मका करंजी/ कचोरी - मटार करंजी सारखेच फक्त मटार ऐवजी मक्याचे दाणे. सारण बनवताना त्यात बरोबर बटाटा/ पनीर/ चीज मनांत येईल ते घाला.
६) मक्याचा कीस - मका किसून घ्यायचा, तेवढीच चणा डाळ ४-५ तास भिजवून मिक्सर मधे बारीक करून घ्यायची व हिरव्या मिर्चीच्या फोडणीत मीठ घालून दोन्ही वाफवून घ्यायचे. शिजवून मोकळे झाले की त्यात लिंबू पिळून वर ओले खोबरे भुरभुरून घालावे.