मला झालेला अपघात प्रसंग लेखन निबंध मराठी
Answers
Answer:
मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela apghat
एके दिवशी मला काहीतरी कामा निमित्त शहराबाहेर दुसऱ्या शहरात जायचे होते. माझ्याकडे मोटारसायकल होती. तिच्यावर बसून मी निघालो घरापासून थोड्या अंतरावर पेट्रोल पंप होते. गाडीत पेट्रोल कमी होते मी विचार केला की आधी पेट्रोल टाकून घेतो मग पुढील प्रवासाला निघतो. यानंतर पेट्रोल पंपावर जाऊन मी पेट्रोल भरवून घेतले.
जसा का मी पेट्रोल भरून बाहेर पडलो. पाहतो तर काय समोरून तुफान वेगात तीन व्यक्ती एका मोटारसायकल वर बसून येत होते. दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती ट्रॅक्टर चालवत येत होता. आणि क्षणातच मोटरसायकल आणि ट्रॅक्टर एकमेकांसमोर आले. ट्रॅक्टरस्वार ने अर्जंट ब्रेक मारला. परंतु मोटरसायकलस्वार व्यक्तींचा वेग ताब्यात आला नाही. आणि दोघांची जोरदार टक्कर झाली. एक भीषण अपघात माझ्या पाहत झाला होता.
मी माझ्या बाईक वरून उतरून तेथे पोहोचतो तेवढ्यात अनेक लोक त्यांच्या आजूबाजूला गोळा झाले होते. पोलिस आणि सरकारी रुग्णवाहिकेला सूचना देण्यात आली. दहा मिनिटांनंतर रुग्णवाहिका आली. बाईक चालवणारा व्यक्ती तर जागीच ठार झाला होता. मध्ये बसलेला व्यक्ती कापत होता. आणि मागे बसलेल्या व्यक्तीचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता. मी पाहिलेला हा अपघात खूप भयानक होता. मला खूप वाईट वाटत होते. मी देवाला त्यांना जीवन दान देण्यासाठी प्रार्थना केली. रुग्णवाहिकेतून काही लोक बाहेर आले त्यांनी बाईक स्वरांना आत टाकले. व दवाखान्यात घेऊन गेले.
त्यांना नेल्यावर रस्त्यावर खूप रक्त पडले होते. ते सर्व पाहून माझे मन विचलित झाले. मी या आधी कधीही असा अपघात पहिला नव्हता. ट्रॅक्टर ड्रायव्हर वर बसलेला असल्याने त्याला जास्त मार बसला नाही. परंतु त्यालाही दवाखान्यात नेण्यात आले. मी थोडा वेळ तेथे थांबलो. आता माझी बाहेर गावी जाण्याची इच्छा पूर्णपणे नाहीशी झाली होती. मी गाडीवर बसलो व हळुवार बाईक चालवत तेथूनच घरी परतलो.
घरी आल्यावर मी विचार करू लागलो की लोक एवढ्या वेगाने गाडी का चालवत असतील बरं... यांच्या चुकीमुळे संपूर्ण कुटुंबाला दुःख सहन करावे लागते. आता त्या तिन्ही च्या घरातील आई-वडील, पत्नी-मुले किती शोक व्यक्त करीत असतील. या शिवाय आपल्या देशात दररोज किती अपघात होतात या अपघातांमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतात तर काही लोक कायमचे अपंग होतात. आपल्याला मिळालेले मनुष्य जीवन अतिशय अनमोल आहे. एकदा मिळालेले शरीर पुन्हा मिळत नाही. म्हणून आपण वाहतुकीचे नियम पाळून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करायला हवे.
जर आपल्याला कोठे जायचे असेल तर नेहमी हळुवार गतीने वाहन चालवायला हवे. कारण आपल्या जीवनापेक्षा आवश्यक कोणतेही काम नसते. कधीही दारू पिऊन आणि नशा करून वाहने चालवू नये. नेहमी डाव्या बाजूने चालायला हवे. प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यानी वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. याशिवाय भारत शासनाने देखील वाहतुकीचे नियम अधिक सक्त करायला हवेत. जेणेकरून कोणीही नियमांचे उल्लंघन करणार नाही.
Explanation:
i hope it helps you
please mark me as a brainleast