मला मिळालेले पाहिले बक्षीस प्रसंग लेखन
plz help it's urgent please
Answers
Answer:
मला मिळालेले पाहिले बक्षीस प्रसंग लेखन
Answer:
शाळेत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कोणाला बक्षीस मिळणार याची उत्सुकता लागलेली होती.
वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार होते. सर्वांनीच खूप छान प्रतिसाद दिला होता. त्या स्पर्धेत मी देखील सहभागी होते. शाळेतील शिक्षकांनी देखील मला व इतर विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शन केले होते. शेवटी सर्वांना उत्सुकता होती ती बक्षिसाची लहान आणि मोठ्यांचा वेगळा गट करण्यात आला होता. हळूहळू एकेका विद्यार्थ्याचे नाव शिक्षक घेऊ लागले तसतसे माझ्या हृदयाचे ठोके हे वाढू लागले. व्यासपीठावर जेव्हा माझे नाव बक्षिसासाठी घेण्यात आले त्यावेळेस माझा स्वतःवर विश्वास राहिला नाही.
माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी ताडकन उठले व व्यासपीठाच्या दिशेने धावत गेले शाळेत पहिल्यांदाच मला बक्षीस मिळणार होते याचा मला जास्त आनंद होत होता. सरांच्या हातून बक्षीस घेताना माझे हात थरथर कापत होते. बक्षीस घेतल्यानंतर सर्वांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या ते दृष्य माझ्यासाठी विलोभनीय होते.
माझ्या आई-बाबांना माझा खूप अभिमान वाटला. माझ्या आयुष्यातील तो सर्वात आनंदाचा क्षण होता. कधीही न विसरता येणारा असा क्षण माझ्यासाठी होता. त्या दिवशी मी पूर्णपणे भारावून गेले होते. माझ्या आठवणींमध्ये हे गोड सत्य नेहमी जपून ठेवणार.