CBSE BOARD XII, asked by akanatwar, 15 days ago

मला पंख असते तर निबंध लेखन मराठी

Answers

Answered by saritasrivas1606
10

Answer:

मला पंख असते तर.. मी दररोज काही अंतर उडत राहिले असते. मलाही सतत खूप भटकंती करावी असे वाटत असते. पण प्रवास म्हटलं की खर्च आलाच. शिवाय प्रवासाची पूर्वतयारी, तिकिटे काढणे वगैरे नकोस वाटते. मला पंख असते तर कशाचीच आवश्यकता भासणार नाही. मनात आले की पंख पसरावे आणि दूरवर प्रवासाला निघावे. प्रवासाबरोबर मला प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचीही खूप हौस आहे.

मला पंख असते तर मी खूप दूरवरचीही प्रेक्षणीय स्थळे पाहू शकले असते. उडत उडत प्रवास करताना मी निसर्गाच्या खूप जवळ जाऊ शकेन. झाडांची ओळख पुस्तकातून करून घेण्यापेक्षा त्या झाडांच्या खूप जवळ जाणे मला फार आवडेल. त्यांची पाने, फुले, फळे यांची माहिती करून घेणे अधिक शक्य झाले असते.

जमिनीवर असणाऱ्या असंख्य इमारती आकाशातून किती छोट्या वाटतील? कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर, ना राज्यांची बंधनं ना देशांच्या सीमा. तसेच एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा कशाचीही आवश्यकता भासली नसती. पंख पसरले की आकाशात भरारी घेऊन स्वच्छंद उडत राहायचे. खरंच मी सर्व देशांची सफर केली असती. तेथील नवनवीन गोष्टी, ठिकाणे, पदार्थ यांचा आस्वाद घेतला असता. बाहेर देशात असणाऱ्या माझ्या नातेवाईकांना सहज वाटेल तेव्हा मी भेटून आले असते. रस्त्यावरील वाहतुकीचा, गर्दीचा त्रास नाही. वाहनांची किंवा वाहन चालवण्याच्या परवान्याची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही.

रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळे पादचाऱ्यांसाठी, हवेत उडणाऱ्याला त्याची काय पर्वा? अवकाशातून ही धरणी सुंदर, हिरवीगारच भासते. पंखांमध्ये बळ सामावून उंचच उंच भरारी घेता येईल. वेळे अभावी, अधिक अंतरामुळे जे अनेक जिवाभावाचे मित्र, नातेवाईक यांची भेट होऊ शकत नाही अशा सगळ्यांना मी भेटू शकेन. सर्वात पहिल्यांदा म्हणजे कुठेही जाण्यासाठी जे आई-बाबांवर अवलंबून राहावे लागायचे ते नाहीसे होईल. कधीही, कुठेही जावेसे वाटले तरी ते सहज शक्य आहे. बसची वाट पाहण्याची गरज लागणार नाही. मी हव्या त्या ठिकाणी मनसोक्त फिरू शकेन. खरंच मला जर पंख असते तर….

Similar questions