मला पडलेले सुंदर, मजेदार स्वप्न मराठी निबंध, भाषण, लेख
Answers
"मला पडलेले सुंदर, मजेदार स्वप्नं"
"स्वप्नात पाहिली बाग
हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग"
मित्रांनो अशीच चित्र विचित्र स्वप्नं मला पडत असतात. एका स्वप्नात मी घनदाट जंगलात होतो, माझ्याबरोबर माझे दोन मित्र आले होते पण आम्ही मार्ग चुकलो आणि एकटा पडलो. मला काहीच समझेना, काय करायचं ते. माझ्याकडे ना खाणं होतं ना प्यायला पाणी. मी हळु हळु चालत होतो. मे खूप घाबरलेला होतो. काय करायचं समजत नव्हते.
संध्याकाळची वेळ जवळ येऊ लागली, सूर्य मावळला व सगळीकडे काळोख झाला. माझी भिती वाढत चालली होती. पण इतक्यात मला माझ्या मागून डरकाळी चा आवाज आला. माझे हात पाय कापू लागले. माझा घसा कोरडा झाला, तोंडातून आवाजच येईना. मी मागे बघितला तर वाघ उभा होता. त्यांचे बछडे पण त्यांच्यासोबत होते. त्याला वाटत होतं की मी त्याला हानी पोचवीन म्हणून तो माझ्याकडेच पळत येत होता एवढ्यात माझा गजर वाजला व मला जाग आली.