मला दात नसते तर......मराठी निबंध
Answers
जर मला दात नसते तर मला खायला आले नसते. मला नीट बोलायलाच आले नसते
Answer:
लहानपणी जेव्हा कधी माझे दात पडायचे,तेव्हा भीतीने आईला सतत हा प्रश्न विचारायची,"आई माझा दात परत कधी येईल गं?" दात परत नाही आला तर,ही भीती सतत वाटत राहायची.
मला दात नसले तर हा विचारच मुळात खूप निराळा आहे.दात नसल्यावर आपल्याला जेवण नीट चावता येणार नाही.अन्न नीट चावले नाही तर ते नीट पचणार नाही,ज्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतील.दातांमुळे आपल्याला नीट व स्पष्ट बोलता येते.
लहान मुलांना दात नसतात,तरीही त्यांचे हास्य खूप गोड दिसते.जर मला दात नसले,तर माझे हास्य फार विचित्र दिसेल.लोक माझ्याकडे पाहून हसतील आणि मला चिडवतील. तेव्हा मी खूप निराश होईन.मग मला म्हाताऱ्या लोकांसारखे कृत्रिम दात म्हणजेच कवळी बसवून घ्यावी लागेल.
दात आपल्या शरीराचे एक महत्वपूर्ण अंग असून आपल्या सौंदर्यात भर घालतात.तेव्हा मला दात नसले तर! हा विचारच मनात आणला नाही पाहिजे.
Explanation: