मला दात नसते तर .... मराठी निबंध
Answers
jr mala daat naste tr mi 56 bhogancha aasvada kadhich chakhala nasta.saglech Jan tarunpani mharare zale aaste. nako tya thikani chukiche shabd nighale aaste .
■■मला दात नसते तर!!■■
लहान बाळ, जेव्हा हसते तेव्हा ते किती गोड वाटते. त्यांना हसताना पाहून आपले मन प्रसन्न होते. त्यांना दात नसतात, पण तरीही ते हसताना किती गोड दिसतात.त्यांच्यासारखेच जर आपल्याला सुद्धा दात नसते तर!!!
मला दात नसते तर हा विचारच मुळात खूप निराळा आहे.दात नसल्यावर आपल्याला जेवण नीट चावता येणार नाही.अन्न नीट चावले नाही तर ते नीट पचणार नाही,ज्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतील.दात नसल्यामुळे मला नीट व स्पष्ट बोलता येणार नाही.
जर मला दात नसते,तर माझे हास्य फार विचित्र दिसेल.लोक माझ्याकडे पाहून हसतील आणि मला चिडवतील.
तेव्हा मी खूप निराश होईन.मग मला म्हाताऱ्या लोकांसारखे कृत्रिम दात म्हणजेच कवळी बसवून घ्यावी लागेल.
दात आपल्या शरीराचे एक महत्वपूर्ण अंग असून आपल्या सौंदर्यात भर घालतात.तेव्हा मला दात नसते तर! हा विचारच मनात आणला नाही पाहिजे.