मला देव भेटला तर निबंध मराठी
Answers
Answer:
मला देव भेटला तर मी देवाला एक आवर्जून करेल की देवा, माझ्या आजूबाजूला माझ्या गावा जात नव्हे तर माझ्या संपूर्ण भारत देशामध्ये माणसामाणसात बंधुभाव नित्य वाढत राहू दे. अनेक वर्षांपासून माझ्या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे पंथाचे आणि संप्रदायाचे लोक एकत्र राहत आहेत. ते सर्व लोक असेच गुण्यागोविंदाने नांदू दे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण होऊ देऊ नकोस.
गरीब आणि श्रीमंत एकमताने याठिकाणी मिळून मिसळून राहू दे. खूप मोठ्या कष्टाने आणि अनेक देशभक्तांच्या आहुतिने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. या स्वातंत्र्याचा आनंद आणि सुख सर्व धर्माच्या लोकांना उपभोगता यावे. अशी विनंती मी देव मला भेटला तर नक्की करेन.
सर्व लोकांमध्ये मानवता निर्माण व्हावी राष्ट्राविषयी प्रेम असावे. अशी बुद्धी सर्वांना दे. कुणीही एकमेकाची निंदा करू नये कुणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीचे वर्तन सर्वांकडून घडावे.