Mala 10 lakhachi lottery Lagli tar essay writing Marathi ?????
Answers
Answer: एकदा मी पुस्तकांच्या दुकानात गेले आणि माझ्या आवडीचे एक पुस्तक मी विकत घेतले. परंतु माझ्या असे लक्षात आले की तेथे माझ्या आवडीची असंख्य पुस्तके होती. परंतु ती सगळी पुस्तके विकत घेण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. मला खूप वाईट वाटले. त्याच क्षणी माझ्या मनात एक विचार आला की जर मला १० लाखांची लॉटरी लागली तर....
तर सर्वात आधी मी माझ्या आवडीची सगळी पुस्तके विकत घेईन. मी आईवडिलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू घेऊन देईन. मला भारतभर फिरायचे आहे. म्हणून मी आवडीच्या ठिकाणांना भेट देईन. मला फोटो काढायला फार आवडते. त्यामुळे मी एक कॅमेरा विकत घेईन. काही पैसे मी एखाद्या ग्रंथालयाला देईन. उरलेले पैसे मी बँकेत ठेवून देईन.
परंतु लॉटरी लागली तर मी आळशी सुद्धा होऊ शकते. पैसा आल्याने माझ्या गरजा तर पूर्ण होतील पण या फुकटच्या पैशाने मला कष्टाची किंमत कळणार नाही. त्यामुळे मला लॉटरी लागली तर ही कल्पना असलेलीच बरी आहे.
Explanation: