mala padlele swapna essay in marathi
Answers
Answer:
The Moon is Earth's only proper natural satellite. At one-quarter the diameter of Earth, it is the largest natural satellite in the Solar System relative to the size of its planet, and the fifth largest satellite in the Solar System overall
Answer:
मी शाळेत गेलो होतो आणि तेव्हा आमच्या शाळेत साफसफाई करण्याचा दिवस होता तर त्या दिवशी मी माझ्या मित्रांनी मन लाऊन शाळेची आणि शाळेच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता केली. शाळेतून घरी आल्यानंतर वडिलांसोबत बाहेर गेलो होतो त्यातही खूप वेळ गेला आणि बाबांच्या मदतीस मदत केल्यामुळे ही खूप थकलो होतो. घरी गेल्यावर मी जेवण केले आणि तात्काळ झोपी गेलो. तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही दिवसभर खूप काम केले असेल तर आपल्याला मनसोक्त आणि गाढ झोप येते. असेच मी गाढ झोपेत गेलो आणि मला एक स्वप्न पडले.
मी लहापणापासून इतिहासिक गोष्टी खूप वाचायचो जसे राजा महाराजांची, शुर वीरांची गोष्टी. त्यामुळे मला मी राजा झालोय असे स्वप्न पडले.एक राज्य होते ज्या राज्यात प्रजाचे खूप हाल होत होते कारण त्या राज्याचा राजा खूप क्रूर होता. तो राजा फक्त त्याचा आणि त्याच्या कुटुंबाच्या हिताचा विचार करत असे आणि त्याला एकूण सहा पत्न्या होतात. तो स्वतःचा विचार करत असल्यामुळे प्रजा ही निराशाजनक राहत होती.
तेव्हा मी माझ्या काही सैन्यासोबत त्या राज्यावर आक्रमण बोलत युद्ध सुरू करतो. परंतु त्या युद्धात माझा पराजय होतो पण मला समजलेले असते की माझा पराजय का झालाय आणि त्या गोष्टींचा सुधार करत मी पुन्हा युद्धाच्या तयारीत लागतो.
त्या राज्यातील प्रजेला जवळ करून त्यांचा समस्यांचे निवारण करतो परंतु काही समस्या अश्या असतात ज्यांचे निवारण फक्त राज्यातील राजाचं करू शकतो. त्यामुळे मला राजा होणे गरजेचे होते आणि प्रजा देखील माझ्या सोबत जोडले गेलो होती. ह्या वेळेस मी पूर्ण तयारीने युद्धाचे आव्हान केले आणि युद्ध सुरू झाले. त्या युध्यात प्रजाचा देखील मला पाठिंबा असल्यामुळे या युद्धात माझा विजय झाला.
विजय झाल्यानंतर सर्वकडे आनंदाचा उत्सव दिसत असतो आणि मी माझ्या राज्य बद्दल विचार करत असतो.
सर्वात आधी मी राज्याचा हाल ठीक करतो जसे राजवाड्याची दुरुस्ती, राज्यातील काही ठिकाणांची दुरुस्ती. मग प्रजेला लागणाऱ्या गोष्टींची सुविधा केली जसे त्यांना पाणी पिण्यासाठी एक तलाव बांधले, गावात विहिरी बांधल्या, शेती करण्यासाठी आर्थिक मदत केली आणि त्यांच्या काही समस्यांचे निवारण केले.
राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार पासून त्यांना दूर केले आणि राज्यात एक नवीन नियम सुरू केला तो म्हणजे जो स्त्रियांवर अत्याचार करेल त्याला फाशी देण्यात येईल. असे खूप सारे प्रजेच्या हिताचे निर्णय मी घेतले.
माझ्या महालातील मंत्रिमंडळ व्यवस्थित केले त्यात मी माझ्या जवळील मित्राला मंत्री केले आणि इतर बाकीच्यांना त्यांच्या शमतेनुसार पदे दिली. त्यात कोणीच निराश नव्हते कारण प्रत्येक त्याच्या त्याच्या मनाप्रमाणे पद भेटली होती.
एका दिवशी मी राजमहालात मंडळ सोबत चर्चा करत होतो आणि अचानक एक वृद्ध महिला आली व माझ्याकडून मदत मागू लागली. मी त्या महिलेला आई हाक मारून जवळ घेतले आणि त्यांची दशा विचारली व तुम्हाला काय समस्या आहे तेही विचारले. त्या महिलेने सांगितले की मला दोन मुलं आहेत आणि दोघांची लग्न झालेली आहेत. माझे वय जास्त झाल्यामुळे ते माझा सांभाळ करत नाहीत आणि मला काही मोठ्या अपेक्षाही नकोत कारण मला दोन वेळेसच जेवण त्यांनी दिले तेवढे देखील पुरे आहे परंतु ते मला तेवढे पण वागत नाहीत. हे एकूण मी एकदम हक्कबक्क झालो की ज्या माताने आपल्याला जन्म दिला मनुष्य आज त्यांचं मातेला वागण्यास मनाई करत आहे. हे एकूण माझा राग मस्तकात शिरला आणि मी त्या मातेच्या दोघी मुलांना दरबारात बोलावले. त्या दोघी मुलांना मी खूप सुनावले आणि नंतर त्यांना समजावून सुध्दा सांगितले आणि सोबतच त्यांना एक चेतावणी दिली की जर तुम्ही ह्या मातेस वागले नाही तर तुम्हाला शिक्षा करण्यात येईल.
हा प्रसंग लक्षात घेऊन मी एक नवीन नियम सुरू केला तो म्हणजे जर कोणी आपल्या माता पितास वागले नाही तर त्याची शेती आणि इतर सर्व मालमत्ता हिसकावून घेण्यात येईल.
काही काळानंतर मला एका युद्धाचा देखील सामना करावा लागला. परराज्यातील राजाने कपटीने आपल्या राज्य वर युद्ध केले परंतु त्यात त्यांचा पराभव झाला कारण मला त्या युद्धाची भणक आधीच लागली होती. आणि सोबत इतर राज्यातील राजांनी देखील त्या युद्धात माझी मदत केली कारण त्यांच्याशी माझे संबंध चांगले होते.
अश्या माझ्या राज्यात सर्वजण आनंदी होते कारण प्रजेला त्यांच्या मनासारखा राजा मिळाला होता जो त्यांच्या मनावर राज्य करत होता.
सकाळी आईने मला शाळेसाठी उठवले आणि माझे स्वप्न एवढेच राहिले. त्या दिवशी शाळेत गेल्यावर शिक्षकांनी वर्गात मला पडलेले स्वप्न निबंध लिहायला सांगितला आणि हाच निबंध लिहून काढला.