Math, asked by Vibaksingh9512, 1 month ago

ममते शिवाय समता नाही निबंध मराठी

Answers

Answered by ademinent01
1

Answer:

आपल्याला आठवते तेव्हापासून आपण नेहमी म्हणतो. आपण भारताचे नागरिक आहोत व सगळे बांधव आहोत . शालेय जीवनापासून अनेक एक वेळा अशी प्रार्थना आपण म्हणतच असतो. परंतु नीट विचार केला तर ह्या प्रतिज्ञेप्रमाणे आपण नेहमी वागतो का?पूर्वीच्या काळी एकत्रितपणे वागणारा जन समाज जगण्यामध्ये सुसूत्रता आणि व्यवस्थितपणा निर्माण व्हावा यासाठी कामांची विभागणी करण्यात आ लाकडाचे काम करणारे सुतार लोखंडाचे काम करणारे लोहार सोन्यासारखे धातु घडवणारे सोनार शेती करणारे शेतकरी अशाप्रकारे अनेक वर्ग निर्माण झाले.पुढे जाऊन तर हे व्यवसाय फक्त व्यवसाय उरले नाही तर त्यांचे जाती मध्ये रूपांतर झाले. स्त्रियांना देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये अपमान सहन करावा लागतो. बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना कमी महत्त्व दिले गेलेले दिसते. तसे पाहता स्त्रिया पुरुषांपेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नाही , उलट त्या पुरुषांपेक्षा काकणभर सरसच असतात. अशी विषमता देखील सामाजिक विषमता म्हणावी लागेल.

आता सर्वात महत्त्वाचे मला असेच म्हणावेसे वाटते की विषमता कोणत्याही प्रकारची असू द्या. जोपर्यंत सर्वांविषयी मनामध्ये प्रेम, करुणा ,माया ,ममता निर्माण होत नाही तोपर्यंत समता देखील निर्माण होऊ शकणार नाही.

सर्व समान आहेत कोणीही तुच्छ किंवा उच्च नाही. सर्वजण एकाच निसर्गाचा भाग आहेत व एकाच परमेश्वराची निर्मिती आहेत अशी ममत्वाची भावना निर्माण झाली की समता आपोआपच निर्माण होईल.

Similar questions