World Languages, asked by narayandesai, 11 months ago

मनाची एकाग्रता कशी वाढवावी??​

Answers

Answered by Itzkrushika156
1

Explanation:

तुम्ही वाद्यवृंदात गिटार वाजवणारे आहात किंवा एक नवशिके तबलावादक, ऑलिम्पिकमध्ये धावपटू आहात किंवा क्रिकेट शिकत आहात, किंवा शल्यचिकित्सक, विद्यार्थी, शिक्षक किंवा नोकरदार आहात, तुम्ही कोणत्याही व्यवसायात असलात तरीसुद्धा तुमची कामगिरी आणि नवीन गोष्टी शिकण्याची तुमची क्षमता हे दोन्ही तुमच्या एकाग्रतेच्या क्षमतेवर अवलंबून असते.

असे आपण अनेक दिवस – कदाचित अनेक आठवडे आणि अनेक महिनेसुद्धा – अनुभवले आहेत जेव्हा आपण कशावरसुद्धा लक्ष एकाग्र करू शकत नाही. कार्यालयीन कामाच्या तणावामुळे किंवा तुमच्या वेळेवर केल्या जाणाऱ्या असंख्य मागण्या यामुळे हे घडत असेल. कारण कोणतेही का असेना पण सगळ्याचा परिणाम एकच होतो तो म्हणजे तुम्ही कशावरही लक्ष एकाग्र करू शकत नाही, आणि याचा वाईट परिणाम होतो तो तुमच्या कामगिरीवर आणि तुमच्या खुशालीवर.

आपल्यापैकी अनेकजणांना एकाग्रतेकरिता प्रयास करावे लागतात. आणि आपल्याला एकाग्रतेमध्ये अडचणी का येतात याची अनेक कारणे आहेत – आपण थकलेलो असतो, कंटाळलेलो असतो, रुची नसते, अस्वस्थता वाटत असते, तणाव जाणवत असतो आणि अशी अनेक कारणे आहेत. एकाग्रतेचा अभाव याचे मुख्यत्वे करून कारण आहे बेबंद आणि अशांत मन हे होय. तर मग मनाला एकाग्र कसे करावयाचे? संशोधनात असे दिसून आले की लोक अनेक ‘स्मार्ट औषधे’ यांचा उपयोग करतात – मग ही औषधे डॉक्टरांनी दिलेलीपासून ते अवैधरीत्या मिळवलेली असू शकतात. आणि हे सर्व असते ते कार्यालयीन किंवा शैक्षणिक कामगिरी उत्तमोत्तम करणे या उद्देशाने. नैसर्गिकरित्या मनाला अधिक विश्रांत करणे हे अधिक सुरक्षित आणि अधिक आरोग्यदायी होईल, नाही का? ध्यानाची साधी तंत्रे आणि मुलभूत जीवनशैलीबरोबर निगडीत क्रिया केल्याने यामध्ये मदत होते. चला तर मग यांच्यावर एक नजर टाकू या:

ध्यान

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की ध्यानाच्या नियमित सरावामुळे आपल्या एकाग्रतेचा अवधीत वाढ होण्यात आणि तो टिकून राहण्यात मदत होते. युनिव्हर्सिटी ऑफ व्हीसकोनसीन-मँडीसन यांच्या नवीन अभ्यासात असे दिसून आले की भाग घेणारे लोक हे ध्यान केल्यानंतर लक्ष विचलित होणाऱ्या परिस्थितीमध्ये कार्य अधिक चांगल्या प्रकारे संपवू शकले.

आपल्या नेहमी ऐकण्यात येते की ध्यान करण्यास एकाग्रतेची आवश्यकता असते. याच्या विरुद्ध म्हणणे आहे श्री श्री रविशंकर, दि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, यांचे. ते म्हणतात, “ध्यान म्हणजे अनवधान होय, आणि सावधपणा व मनाची एकाग्रता हे नियमित ध्यानाच्या सरावाचे परिणाम आहेत.”

तुम्ही ध्यान कसे करू शकता याबाबत काही थोडक्यात प्राथमिक सूचना खाली दिलेल्या आहेत:

• श्वासाचे निरीक्षण करणे–प्राण या महत्वाच्या जीवन-शक्ती उर्जेचे मुख्य स्रोत श्वास हा आहे. केवळ तुमच्या श्वासाबाबत जागरूक झाल्याने तुम्ही ध्यानात जाऊ शकता. एक साधी सूचना अशी की याकरिता स्वतःसाठी एक शांत जागेची निवड करा आणि ध्यान सुरु करण्याअगोदर दोन मिनिटे स्वतःच्या श्वासाच्या नैसर्गिक लयीचे निरीक्षण करा.

• प्राणायाम – श्वास घेणे, रोखणे आणि सोडणे हे प्राणायामाचे मुख्य पैलू आहेत. लहान अवधीकरिता आणि मोठ्या अवधीसाठी तुमची उर्जेची पातळी वाढवण्यासाठी नियमित प्राणायामांचा याशिवाय अन्य कोणतीच उत्तम पद्धत नाही. नाकपुडी आदलून-बदलून श्वसन करणे ज्याचे संस्कृत नाव ‘नाडी शोधन प्राणायाम’ आहे ज्याचा अभ्यास ध्यान सुरु करण्याआधी काही मिनिटे करावा. हे एक फार सुंदर तंत्र आहे. हे केल्याने मन आनंदी, केंद्रित आणि शांत राहण्यात मदत होते.

Similar questions