Art, asked by Patilsiddharth, 1 year ago

Manus bolne visarla tar Marathi nibandh​

Answers

Answered by AbhimanyuRajput
11

your answer is ...................

Attachments:
Answered by halamadrid
19

Answer:

माणूस बोलणे विसरला तर,लोकांशी संवाद कसा होईल?पत्र,मोबाइलच्या मदतीने संदेश पाठवायला लागतील.हातांच्या खुणांनी संवाद साधावा लागेल. यामुळे लोकांनमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. कारण लिहिण्यापेक्षा तोंडी संवाद जास्त योग्य असतो.

रेल्वे स्थानक,विमानतळावर महत्वाच्या घोषणा होणार नाहीत.सगळ्या घोषणा लेखी स्वरूपात कराव्या लागतील.बाजार आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लोक बोलायला विसरले तर व्यापार कसा होईल,बाजारात तर व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तोंडी संवाद.

शाळा,कॉलेजमध्ये अभ्यास कसा शिकवला जाईल,तेथे वकतृत्व स्पर्धा होणार नाहीत.रेडियो,टीव्हीच्या माध्यमाने बातम्या ऐकायला मिळणार नाहीत.भ्रमणध्वनी,दूरध्वनीवर कोणाशी बोलता येणार नाही.

माणूस बोलायला विसरला तर, सगळीकडे शांतता होईल.लोकांच्या मनातील विचार नीट व्यक्त होणार नाहीत.गप्प राहिल्यामुळे आपल्याला खूप कंटाळा येईल.संदेश पाठवून संवाद करता येऊ शकतो पण माणूस दिवसातून किती तास लिहत बसणार,त्यामुळे त्याच्या हाताची बोटे दुखतील.

आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा ज्ञान वाढते, विविध गोष्टींची जाणीव होते.इतरांशी बोलल्यावर आपल्याला बरे वाटते.अशा वेळी,माणूस बोलणे विसरला तर, त्याला खूप समस्या होतील.

Explanation:

Similar questions