Manvi jivnat sanvadache mahatva
Answers
Answer:
संवाद म्हणजे आदान - प्रदान, देवाण - घेवाण, संप्रेषण, संज्ञापन इत्यादी. थोडक्यात संवाद म्हणजे आपल्या मतांचा केलेला आदान - प्रदान किंवा देवाण - घेवाण होय.
"एका व्यक्तीद्वारे इतर व्यक्तीकडे अथवा व्यक्ती समूहा कडे चिन्हाद्वारे माहितीचे प्रेषण किंवा प्रक्षेपण होय."
"संदेशा द्वारे चालणारी आंतरक्रिया म्हणजे संवाद".
संवाद हि संस्कृतीशी संबधित प्रक्रिया आहे. याचाच अर्थ ज्या व्यक्तीला संवाद साधायचा आहे. तिची आणि ज्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे या दोघांचीही संस्कृतिक पार्श्वभूमी एकच असल्यास संवाद अधिक प्रभावी होतो.
ज्यावेळी विविध प्रसार माध्यमांचा वापर करून संवाद केला जातो व तो संदेश खूप लोकापर्यंत पोहोचविला जातो त्यास जनसंज्ञापन म्हणतात.मानवी जीवनामध्ये संवादाला खूप महत्वाचे स्थान आहे. संवादाला मानवी जीवनामध्ये फार महत्वाचे स्यान आहे. संवामुळे विचारांची देवाण घेवाण होते.
संवाद हा परस्परांमध्ये होणे खूपच गरजेचा असतो. कारण कोणताही मनुष्य हा एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय राहूच शकत नाही