मराठी आमची माय भुमी निबंध लिहा..
Answers
महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्या आणि दगड-मातीतून इथला इतिहास दरवळतो. आपल्या तलवारीच्या बळावर इतिहास घडविणारी पोलादी मनगटाची नररत्ने जशी या भूमीत जन्माला आली तशीच आपल्या अनुभव विश्वाच्या आणि शिकवणुकीच्या बळावर पोलादी समाज मन घडवणाऱ्या संत विभूतींनीही या भूमीला आपल्या अस्तित्वाने पावन केले आहे. साहित्य, काव्यशास्त्र संगीत आणि अष्टकलांची खाण असलेल्या शिवबाच्या या भूमीत तुम्ही-आम्ही जन्माला आलो. याचा निश्चितच सर्वांना अभिमान वाटणे साहजिकच आहे.
याच मातीने रोहिडेश्वराला स्वरक्ताने अभिषेक घालून स्वराज्याची शपथ घेणारे शिवरायही जन्माला घातले आणि 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार' असे ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्यांनाही घडवले. याच मातीने मायमाऊली ज्ञानदेव आणि तुकारामही जन्माला घातले आणि बाबा आमटे, सचिन तेंडुलकर आणि गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या कार्याची प्रेरणाही हीच भूमी...
छातीचा कोट करून मोगली साम्राज्याला राखून धरणारा मर्द मावळा याच भूमीतला आणि स्वातंत्र्याच्या ध्येय्यापोटी समुद्र पोहून जाण्याची ताकत असलेला विनायक दामोदर सावरकर नावाचा महापुरूषही याच भूमीतला.
जितका रंजक इथला इतिहास तितकाच वैविध्यपूर्ण इथला निसर्गही!
फेसाळलेले सागर किनारे आणि उधाणलेल्या दर्याला आव्हान देणाऱ्या लालमातीतला कोकणी माणूस असो किंवा उत्तूंग सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांना आव्हान देत काळ्या आईच्या सेवेत रमणारा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सर्व याच भूमीची लेकरं..
hope it helps you
Answer:
Im fine and what about uhh
Explanation:
construct a parallelogram pqrs with PQ is equal to 6 cm and Rs equals to 3 cm and PS equals to 5.3 cm and equals to 120 degree