मराठी आत्मकथन कोल्ह्याला द्राक्षे आंबट कोल्ह्याचे आत्मकथन
Answers
Answer:
कोल्ह्याला द्राक्ष आंबट......
Explanation:
कोल्ह्याला द्राक्षे आंबट... (आधुनिक नव्या उदाहरणाची गोष्ट)
एक भुकेलेला कोल्हा फिरत फिरत एका द्राक्षाच्या मांडवाखाली आला. वर पाहतो तो सुंदर पिकलेले द्राक्षाचे घड लोंबत आहेत; परंतु मांडव उंच असल्यामुळे ते त्याच्या हाती लागेनात. त्याने पुष्कळ उडया मारल्या, परंतु एकही द्राक्ष त्यास मिळाले नाही. मग अंमळ दूर जाऊन द्रक्षांकडे पाहून तो म्हणतो, ‘जाऊ दे ही द्राक्ष खुपच आंबट आहेत." असा विचार करून तो निघून जातो...
ही झाली जुनी गोष्ट...
आता या गोष्टीमध्ये थोड्या नव्या काही घडामोडी घडतात... त्या वाचा..
कोल्हा निघून जात असताना तिथे उंट येतो. उंच असल्यामुळे त्याला ती द्राक्षे सहज खाता येण्यासारखी असतात. तेव्हा उंट त्या द्राक्षांचा मनमुराद आनंद घेत असतो. तो भुकेल्या कोल्ह्याला पाहातो. प्रत्येक व्यक्तीचा सहजभाव असतो की, चांगली वस्तू असली की तो इतरांनाही त्याबद्दल सागंतो. अगदी त्याच प्रमाणे उंट कोल्ह्याला म्हणाला, "ही द्राक्षे खुपच सुंदर आणि गोड आहेत. मन तृप्त करणारी आहेत." पुढे "उंट कोल्ह्याला तुला खायला तोडून देऊ का?" हे म्हणायच्या आतच... कोल्हा बडबडायला लागतो.
कोल्हा म्हणतो "ती द्राक्षे फार आंबट आहेत. पण तुला तर जे फुटक मिळते ते गोडच लागते. तु आहेसच फुटका. फुकट मिळेल म्हणून काहीही खायायला तयार असतोस तु" असे सांगत कोल्हा उंटाला मुर्खात काढायला लागतो."
कोल्ह्याचे हे बोलणे ऐकून उंटला राग येतो आणि तो काहीच न बोलता कोल्ह्याकडे दुर्लक्ष करत मनमुराद द्राक्षांचा आनंद घेतो. आणि एक गोष्ट मनात ठरवतो की, "यापुढे आपण कोणालाही काहीही चांगले सांगायचे नाही की, त्याच्याबद्दल चांगला विचार करायचा नाही." त्यानंतर उंट पोटभर द्राक्ष खाऊन निघून जातो. आणि कोल्हा तसाच उपाशीपोटी पुन्हा द्राक्षांकडे पाहात राहातो..
तात्पर्य:- कित्येक लोक असे असतात की, त्याच्या हाती एखादी चांगली वस्तू लागली नाही म्हणजे तिला ते काही तरी खोड ठेवून आपला हलकेपणा लपविण्याचा प्रयत्न करतात. सोबतच इतरांना ती चांगली वस्तू मिळाली असेल तर, त्या व्यक्तीला सुध्दा ती नावे ठेवायला मागे पुढे पाहात नाहीत.
#सहजसुचलंम्हणून