India Languages, asked by vishakha8441, 2 months ago

मराठी बातमीलेखन करा.​

Attachments:

Answers

Answered by himab8420
1

Answer:

बातमीलेखन : जागतिक वृद्ध दिन विशेष

२ ऑक्टोबर, २०१९ पुणे: काल संध्याकाळी १ ऑक्टोबर २०१९ रोजी रसिक मित्रमंडळतर्फे जागतिक वृद्ध दिनानिमित्त शिवाजी उद्यानात गायन, वादन आणि कथाकथन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्व रसिकांना आमंत्रण होते आणि प्रवेश मोफत होता.

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनीही एक गाणे गाऊन आपली रसिकता दाखवून दिली. अनेक वृद्ध आणि लहान मुले यांनी आपली कला सादर केली.

हा कार्यक्रम संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत संपन्न झाला. अनेक रसिक वृद्ध तसेच शाळेतील मुले आणि इतर रसिक प्रेक्षक कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Similar questions