मराठी भाषा आणि मराठी माणूस निबंध
Answers
Explanation:
अंजली कीर्तने यांनी बी. ए.ला मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांक पटकवला आहे. त्यांनी 'मोलिएरचा मराठी नाटकावरील प्रभाव' याविषयावर पि.एच.डीसाठी प्रबंध लिहिला आहे. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, नवशक्ती, तरुण भारत, सकाळ या वृत्तपत्रातून अनेक सदरलेखन केले आहे. त्यांची प्रवासी पावलं, नोंदवही कवितेची, लिबर्टी बेल, संगिताचं सुवर्णयुग अशी अनेक सदरलेखने प्रसिद्ध आहेत. त्यांचे डॉ. आनंदीबाई जोशी(चरित्र), पाऊलखुणा लघुपटाच्या यांसारखे चरित्र, अनुभवकथा, लघुकथा, प्रवासवर्णनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
99675 16913
Answer:-
आजकाल साधी पण सुंदर मराठी भाषा कानावर पडत नाही; अथवा लिहिली जात नाही अशी खंत अरूण खोपकर यांनी एका टिपणाद्वारे व्यक्त केली. ती रास्त आहे. शांता शेळके यांचे ‘वडीलधारी माणसे’ हे पुस्तक अलिकडेच वाचले. त्यावेळीदेखील तसेच विचार माझ्या मनात आले, की त्या पुस्तकात आहे तशी सहजसुंदर, प्रसन्न मराठी भाषा कोठे हरवली? माणसांच्या लिहिण्याबोलण्यातून मोठ्या प्रमाणात कानावर पडते ती इंग्रजाळलेली, कृत्रिम व धेडगुजरी मराठी. इंग्रजी शब्दांचा तिच्यातून इतका मारा होतो, की तिचे मराठीपण हरवून जाते. बोलण्या-लिहिण्यात एका वाक्यामध्ये पाचांपैकी तीन शब्द इंग्रजी वापरून ते फक्त मराठी विभक्ती प्रत्ययाने जोडणे हे मराठी नव्हे. शिवाय, विभक्ती-प्रत्यय कोठेही कोणताही जोडला जातो. त्यामागे असते मराठी भाषेचे अज्ञान आणि शब्दसंपत्तीचे दुर्भीक्ष्य. मराठीसारख्या अर्थसघन, समृद्ध भाषेला रोगट, अशक्त बनवण्यात वृत्तपत्रे व दूरदर्शन वाहिन्या यांनीही चोख भूमिका बजावलेली आहे. या माध्यमातून तरुणांना आकृष्ट करण्याच्या नावाखाली, ती बोलतात तसे इंग्रजाळलेले मराठी जाणीवपूर्वक वापरले जाऊ लागले, तेव्हा तशा बेगडी मराठीला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मग युवा पिढीवर रसाळ, सहजसुंदर मराठीचा संस्कार होणार कोठून?
Hope it's help You❤️