India Languages, asked by adityakhairnar149, 9 months ago

मराठी भाषेबद्दलच्या तुमच्या भावना स्पष्ट करा​

Answers

Answered by harshalis1126
57

Answer:

मराठी भाषा भरपूर प्रगत आहे प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजेच महाराष्ट्रातील राहणाऱ्या लोकांच्या जिभेवर तोंडावर रेंगाळलेली भाषा आहे जसजसे पाणी बदलावे तसतशी मराठी भाषा बदललेली दिसते याचं स्वरुप काय असेल हे माहित नाही परंतु प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावागावात या भाषेचे बदललेले स्वरूप दिसते. येणाऱ्या काळात मराठी भाषा राहील की नाही यावर मत आपण मांडू शकतो कारण प्रत्येक कुटुंब हे आपल्या मुलांना मराठी भाषा किंवा मराठी शाळांमध्ये पाठवत नाहीत प्रत्येक पालक आपल्या मुलांना इंग्रजी शिकावे यासाठी प्रोत्साहन देत आहेत कालांतराने मराठी भाषा लोक पाहुण्याचा हा मुद्दा असू शकतो मराठी नाटके मराठी चित्रपट मराठी लोकसंस्कृती यांमध्ये इंग्रजी भाषेचा वापर जास्त करण्यात येत आहे यामुळेच प्रत्येक मुलांना पालकांना असे वाटते की मराठी भाषा कमी आणि इंग्रजी भाषा जास्त प्रमाणात वापरली जात आहे परंतु मराठी भाषेचा वापर हा कित्येक वर्ष जुना आहे इंग्रजी भाषेचा वापर हा अलीकडच्या काळामध्ये व्यवहारात वापरला जातो ती आपली बोलीभाषा नाही मराठी भाषा ही आपली बोलीभाषा आहे ती कधीही संपू शकत नाही तीन संपण्यासाठी आपल्या मुलांना पालकांना हे समजून दिले पाहिजे की मराठी भाषा ही प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व गाजवणारे आहे यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढे येणे गरजेचे आहे.

Answered by sumedhakulkarni055
16

Answer:

मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारत देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.[१]

Explanation:

प्लीज मार्क मी brainlist

Similar questions