Hindi, asked by lakshmimumbai, 11 months ago

मराठी भाषेचे आत्मकथन

Answers

Answered by habibqureshii
41

Answer:

“मी मराठी भाषा बोलतेय!  अवघ्या महाराष्ट्राची मायबोली. देववाणी -संस्कृत भाषा ही माझी महामाय. संस्कृतातून प्राकृत निर्माण झाली आणि प्राकृतातून मी अवतरले. पण हे परिवर्तन काही आजचे नाही. त्याचप्रमाणे ते एका दिवसात झालेले नाही. वर्षानुवर्षे हे परिवर्तन चालू होते. सामान्य जनांच्या बोलीतून मी जन्माला आले... मला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. माझा भांडार सम्रूद्ध झाले. आज सातशे वर्षेात मला माझ्या सारस्वतांनी खूप घडवले त्यात कधीही खंड पडली नाही. माझ्या शुद्धतेविषयी सांगायचे झाले तर अगदी शिवाजी राजांनीही स्वराज्य स्थापनेनंतर पहिले काम काय केले असतील तर माझे शुद्धीकरण करून माझा शब्दकोश तयार करवून घेतला.. माझे मूळ ज्या गीर्वाण-वाणीत आहे तिचा खजिना तर माझ्यासाठी खुला असतो. १९६० साली माझे स्वतंत्र राज्य झाले.. मी राज्यभाषा झाले....

पण आता आजकाल अनेकदा माझ्या भविष्याबद्दलची चिंता व्यक्त केली जाते.. मराठी भाषेचे भवितव्य काय? कारण मोठ मोठ्या शहरांमध्ये मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. बहुसंख्य महाराष्ट्रीय मंडळी आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात.. का?? तर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे जगातील विविध स्पर्धांमध्ये मराठी मुले मागे पडतात... अस त्यांच म्हण असत... अहो मीच काय.... पण कोणतीही भाषा टिकवणे व तिचा विकास करणे म्हणजे काय?? तर संभाषण, लेखन व वाचन यांचे क्षेत्र विस्तृत, सखोल व व्यापक होत जाणे.. पण माझ्याच या महाराष्ट्रात सर्व लोक मराठी म्हणजे माझा उल्लेख करतात का??? या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने “नाही” असे आहे...  

ही उच्चशिक्षित व उच्चभ्रू वर्गातील लोक तर त्या इंग्रजी भाषेचा वापर करून संभाषण करतात... कोणाला पत्ता सांगताना पण मराठी माणूस हिंदी भाषेचा वापर करतात... सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग MoM DaD बोलून. सकाळच्या दिवसाच्या सुरुवातीला माझा विसर होतो.. रिक्षावाल्याला “आगेसे पिछेसे ” करत दिशा दाखवली जाते.. तेव्हा मराठी माणूस मला या महाराष्ट्रातच प्रवास करताना विसरतो...

का.. तर माझा वापर करून संभाषण करण त्यांना कमीपणा किंवा गरजेचे वाटत नाही... वाचनाच्या बाबतीतही अवस्था वाईटच आहे. एकतर मुळातच लोकांमध्ये वाचनाची आवड कमी आहे. त्यामुळे मराठी पुस्तके वाचण्याकडे लोकांचा कल नाही.. त्यामुळे मराठी पुस्तकांची विक्री होत नाही.. याचा परिणाम हाच की माझा म्हणजे मराठी भाषेचा सखोल चर्चा होत नाही.. अशा स्थितीत कसा होणार माझा विकास?   न्यायालये, सरकारी कार्यालये, महापालिका कार्यालय, विविध कंपन्या,बँका,दुकाने वगैरे या सर्व ठिकाणी माझा वापर करून पुर्णपणे व्यवहार केले जात नाही.. जेव्हा साध्या व्यवहारांतील हवापाण्याच्या गप्पांपासून ते उच्च पातळीवरील चर्चांपर्यंत सर्व व्यवहार मराठीतून होतील तेव्हाच मी सक्षम व सुदृढ होईल.. खुद्द मराठी माणूसच माझा कारणीभूत ठरेल.. मला जपण्यासाठी व अधिक चोख ठेवण्यासाठी  माझा मराठी माणूसच प्रयत्न करत नाही.. मराठीचा विकास होण्यासाठी मराठी माणसाचा विकास झाला पाहिजे तरच मी म्हणजे मराठी भाषा जिवंत राहीन..

“पण मित्रांनो कोणतीही काळजी नका करू मी कधीच नष्ट होणार नाही कारण खेडोपाड्यात पसरलेले माझे लाखो भाषिक सदैव जिवंत ठेवतील.... ”

“भाषा माझी साजिरी गोजिरी...! ”

Explanation:

Answered by Anonymous
13

Answer:

above answer is right _________

Similar questions