India Languages, asked by suyashdere123, 3 days ago

मराठी भाषेची वैशिष्ट्ये​

Answers

Answered by kamblefamilykids
4

Answer:

सुमारे ८ ते ८.५० कोटी लोक मराठी बोलतात.

मराठी ही जगातील दहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. काही वर्षांपूर्वी ती १९ व्या स्थानी होती.

भारतातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा तिसरा क्रमांक लागतो. हिंदी, व बंगाली या अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून महाराष्ट्र, दमण दीव आणि दादरा आणि नगर हवेली यांची अधिकृत तर गोव्याची दुसरी अधिकृत भाषा आहे.

मराठी भाषेच्या अनेक उपबोली आहेत. त्यातील काही प्रमुख बोली : प्रमाण मराठी, अहिराणी, वऱ्हाडी, कोळी,मालवणी, चित्पावनी, दक्षिणी (तंजोर मराठी) इत्यादी.

मूळ मराठी भाषा ही मोडी लिपीत लिहिली जात असे. आता मात्र ती बाळबोध (देवनागरी) लिपीत लिहिली जाते.

भारतातील सर्वात प्राचीन वाङ्मयांपैकी काही मराठी भाषेत आहेत. इसवी सन ६०० च्या सुमारास हे वाङ्मयप्रकार लिहिले गेले असावेत.

मराठी भाषा ही इंडो-युरोपियन भाषा कुटुंबातील इंडो-आर्यन या उपकुटुंबाची सदस्या आहे.

अनेक इंडो-आर्यन भाषांमध्ये (जसे‌ हिंदी) दोनच लिंगे मानली जातात. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. मात्र मराठी व्याकरणात नपुंसकलिंग सुद्धा आहे.

मराठी भाषेची जुनी आवृत्ती, जिला महाराष्ट्री प्राकृत असे म्हणतात, तीत लिहिलेला शिलालेख जुन्नरजवळ नाणेघाटात सापडला. याचा काळ अंदाजे इसवीसन पूर्व तीनशे वर्षे असावा.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठीत रुजलेले पारिभाषिक शब्द काढून त्या जागी मराठी शब्द सुचवून मराठी भाषा समृद्ध केली. उदाहरणार्थ - तारीख (फार्सी) = दिनांक. मेयर (इंग्लिश)= महापौर.

दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. मराठीतील थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा हा जन्मदिवस आहे.

Answered by karanghodake428
5

Answer:

मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे

मराठी भारताच्या 22अधिकृत भाषांपैकी एक आहे

Similar questions