मराठी भाषेला केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answered by
5
मराठीभाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.[१] २०११ च्या जनगणनेनुसार, भारत देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे.
Similar questions