मराठी भाषेने आपल्याला या गोष्टी दिला
Answers
Answered by
1
Answer:
मराठी भाषा कधी जन्मास आली असावी असा प्रश्न उपस्थित करत मराठी भाषेच्या उत्पत्तीच्या दिशेने शोध घ्यावा लागतो. मराठीचा उगम शोधता येणे शक्य आहे का ? भाषा ही नदीसारखी प्रवाही असते, तसेच ती सतत मंद गतीने बदलत असते असे काही तात्विक सिद्धांत मांडल्यानंतर मराठी भाषा ही कोणत्या तरी या स्टेशन पासून सुरु झालेली आहे असे म्हणता येईल का? भाषेचा जन्म काल शोधणे शक्य नसते कारण भाषा सतत बदलत असल्यामुळे तिच्या रुपात सतत बदल होत असतो. नदी जशी वळसे घेत जाते तशी भाषा देखील अनेक कारणांनी बदलत असते.
तरीही माणसाला माणूस कधी जन्माला आला याची जशी जिज्ञासा असते, तशीच जिज्ञासा . आपली भाषा कधी जन्मास आली असावी अशी जिज्ञासा आहे. भाषेचा अभ्यास मागे जाऊन करावा लागतो. म्हणजेच भाषा भूतकाळात कसकशी वाहत आली? कशी बदलत आली? कोणत्या प्रकारे बदलत आली? याचा शोध घ्यावा लागतो.
Similar questions