India Languages, asked by manu00694, 2 months ago

मराठी भाषा दिनानिमीत्त मराठी ​

Answers

Answered by Anonymous
19

Answer:

मराठी भाषा गौरव दिन (मराठी राजभाषा दिन) हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला

१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारा 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. १ मे १९६६ पासून तो अंमलात आला

Hope it help's you

Plz mark my Answer as Brainliest

Similar questions