मराठी भाषा दिवस निबंध
Answers
Answer:
www.loksatta.com
मराठी भाषा दिवस आणि भाषाभ्रम se friend
Answer:
महाराष्ट्राची शान म्हणजे आपली मायबोली. मराठी भाषा. २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. आपली भाषा हि फक्त संवादाचे साधन नसून आपल्या हृदयाच्या जवळ असणारी गोष्ट आहे.
ह्या लेखामध्ये आम्ही माझी मायबोली मराठी भाषा या विषयाबद्दल माहिती, निबंध भाषण दिला आहे. हि माहिती तुम्हाला शाळेमध्ये मराठी राज्यभाषा दिनावेळी तसेच माझी मायबोली, मराठी भाषा या विषयावर मराठी निबंध, भाषण, लेख लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.
माझी मायबोली मराठी भाषा मराठी निबंध भाषण, लेख
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी |
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||
भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. केवळ भारतातच नव्हे तर मराठी भाषा मॉरिशस व इस्रायल मध्येही बोलली जाते. मराठी हि महाराष्ट्राची एकमेव राज्यभाषा आहे. त्याचप्रमाणे गोवा, कर्नाटक, गुजराथ, आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू मध्येही हि भाषा बोलली जाते. शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्य उभे केले आणि पेशव्यांनी त्याचे अटकेपार झेंडे लावले. त्यानंतर खऱ्या अर्थाने मराठी भाषेस राज्याश्रय मिळाला.
१९४७ च्या स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झाला. मराठी भाषा हि साधारणपणे १५०० वर्ष जुनी भाषा समजली जाते. त्यानंतर काळानुसार त्यात बदल होत गेले. मराठी भाषेच्या काही बोलीभाषा सुद्धा आहेत त्यापैकी अहिराणी, कोंकणी, कोल्हापुरी, चित्पावनी, खान्देशी, नागपुरी, मराठवाडी, बेळगावी या काही प्रमुख बोलीभाषा समजल्या जातात. देश तसा वेष या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रात पाच कोसांवर बोलीभाषा बदलते. मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामुळे देवनागरीचे मुळाक्षरे हेच मराठी मुळाक्षरे होत. यात बारा स्वर आणि छत्तीस व्यंजन आढळतात. मराठी भाषा निबंध, भाषण, लेख, इतिहास, महत्व मराठी मध्ये